Category: पुस्तक परीक्षण
-
जॉनाथन स्ट्राऊड आणि ऍम्युलेट ऑफ समरकंड

जे.के. रोलिंग चं हॅरी पॉटर वाचून झाल्यावर जादुई जगतातील अजून काही वाचावं का नाही…हे नक्की कोडं आहे…पण तरीही… जॉनाथन स्ट्राऊड याचं ऍम्युलेट ऑफ समरकंड हातात आलं… आणि तेही तितकंच रंजक असल्याचं जाणवलं. या पुस्तकात जादुई जग हे सामान्य जगाचा एक भाग आहे इतकंच नव्हे तर ते कुठेतरी ब्रिटनचा कारभारही चालवत…
-
बोक्या सातबंडे

बोक्या .. नावातच काहीतरी उचापती किंवा मस्ती करणारा हा मुलगा असणार हे आलंच. दिलीप प्रभावळकर लेखणीतून अवतरलेल्या या पात्राबद्दल किती बोलावं तेवढं कमीच आहे. हे पात्र शेंडेफळ, दंगेखोर, जरा आगाऊच पण हुशार, धाडसी, लोकांना मदत करण्यासाठी धावून जाणारा आणि नितांत लाघवी, संवेदनशीलही आहे. मित्राने पाळलेल्या प्राण्यांची काळजी घेताना गोंधळ घालणारा…
-
शिरवाडकरांच्या विनोदी कथा

परवा कथेच्या पुस्तकाचा शोध घेत असताना हे पुस्तक दिसलं. वि. वा. शिरवाडकर यांच्या विनोदी कथा. कवी कुसुमाग्रज आणि नटसम्राटचे नाटककार शिरवाडकर या पुस्तकात भेटले ते भलतेच निवांत लेखक म्हणून. साधी सरळ भाषा तितकेच साधे सरळ विनोद. या पुस्तकात पंधरा वेगवेगळ्या कथा आहेत, विषयही वेगवेगळे. हो, अगदी साधे सोपे. मुळात उत्कृष्ट…
-
गूढ आणि गंभीर जी ए: पिंगळावेळ

कॉलेजमध्ये असताना जीएंचं लेखन आणि त्याबद्दलही खूप ऐकलं. ते मुद्दाम वाचायला मात्र घ्यावंसं वाटलं नाही कारण ते कायमच गूढ, अनाकलनीय वाटत राहिलं. सध्या त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने बरेच कथावाचनाचे कार्यक्रम होताहेत. तेव्हा घरात असूनसुद्धा न वाचलेलं पुस्तक जरा वाचून तरी बघूया म्हणून खरं तर वाचायला घेतलं. पिंगळावेळ: कथांचं पुस्तक…. दीर्घ कथांचं.…
-
द फेमस फाइव्ह

माझं स्वतःचं शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं असल्यानं मुलांना पुस्तकं वाचायला देताना आधी मी ते वाचून मगच त्यांना देते. तशी टिनटिन चा फडशा पाडल्यानंतर भेटली ही एनिड ब्लायटन. द फेमस फाइव्ह ही तिने लिहिलेल्या मुलांच्या साहसकथांची मालिका आहे. या कादंबऱ्यांमधील प्रमुख पात्रे आहेत, जॉर्ज, डिक, अॅन, ज्युलियन आणि जॉर्जचा कुत्रा…
-
युगान्त
इरावती कर्वे यांचं ‘युगान्त’ हा आहे महाभारत कथेवरील शोधग्रंथ. महाभारतातील विविध पर्व कथा उलगडत जाते ती या कथेतील पात्रांच्या मदतीने. इरावती कर्वे या कथेतील रूढार्थाने प्रसिद्ध झालेल्या कितीक पात्रांची काहीशी नवी ओळख करून देतात आणि त्याबद्दलचे संदर्भ आणि त्याचं तटस्थपणे केलेलं विश्लेषण सादर करतात. प्रत्येक पात्राबद्दलची त्यांची भूमिका थोडक्यात सांगायची…
-
गीतेच्या गाभाऱ्यात
भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय पाठांतर, ज्ञानेश्वरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली तुम्ही निदान वाचा तरी असं आजीनी आवर्जून सांगितलेलं, टिळक जयंती निमित्त शाळेत झालेल्या निबंध स्पर्धेत लोकमान्य टिळकांनी तुरुंगात असताना गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला हे न विसरता लिहायचं म्हणून लक्षात ठेवलेलं ही आणि इतकीच काय ती गीतेविषयीची माहिती. या असल्या पायावर…
-
रामप्रहर
नोव्हेंबर १९९२ ते मे १९९३ या काळात ‘रामप्रहर’ हे सदर विजय तेंडूलकर यांनी लोकसत्ता दैनिकासाठी लिहिले. या पुस्तकात त्यातील निवडक ललित लेखांचे संकलन केलेले आहे. रातराणी आणि कोवळी उन्हे यातील ललित आणि रामप्रहर मधील ललित यात प्रचंड तफावत दिसून…
