Category: लहान मुलांच्या गोष्टी
-
गणूची आठवी गोष्ट: हाक
का कुणास ठाऊक? गणू मोठा होत चाललाय तसतसा आईचा चढा आवाज त्याला जास्त वेळा ऐकू येऊ लागलाय. तो कुठलंही काम करत असला की नेमकी त्याच वेळी म्हणे आईनी हाक मारलेली असते. परवा चक्क जुन्या चित्राच्या वहीत रंगवारंगव चालू होती, तेवढ्यात त्या रंगाच्या डबीतली वडी फरशीवर पडली, ती उचलायला गेला तर…
-
गणूची सातवी गोष्ट: ऑक्सिजन
तशी ही गोष्ट फारशी नवी नाही. मला काल साक्षात्कार झाला इतकंच. पुण्यातल्या एका गजबजलेल्या रस्त्यावर दुचाकी पार्किंग करतानाची ही घटना. खेळाची मैदानं शोधूनच सापडवावी लागतात त्यात तिथेच सगळी लहान मुलं खेळायला येतात. तिथेच जिम आणि इतर सर्व सोई केलेल्या असतात. अशात संध्याकाळी बेफाम गर्दीतून वाट काढत आई-वडील मुलांना खेळायला घेऊन…
-
गणूची सहावी गोष्ट: शंकासूर
नव्या वर्षाला सुरुवात झाली. ती उत्साहाने, आनंदाने असं म्हणेपर्यंत आपण नव्या वर्षातला महाराष्ट्रातला एक अस्वस्थ दिवस जगलो सुद्धा. स्वप्न आणि वास्तवातला हा फरक. स्वप्न गोड, वास्तव कडवं. असत्य छुपं आणि सत्य उजळ. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन होताहेत तोच रस्ता बंद, महाराष्ट्र बंद चे नारे. येत्या काळात आपला देश आणखी पुढे…
-
गणूची पाचवी गोष्ट: चंद्र
२०१७ संपलं २०१८ चालू. गेल्या वर्षातल्या किमान पाच तरी चांगल्या गोष्टी आठवता येतात का म्हणून गप्पा मारायला सुरुवात केली तर चांगली भली थोरली यादी झाली. त्यामुळे दिवसाची सुरुवात उत्तम झाली. त्यात नवीन वर्षाची डायरी, तिचं पहिलं पान .. खरं तर त्यावर फार तर फार एखादी आवडती जुनी कविता लिहावी असंच…
-
गणूची चौथी गोष्ट : घर
परवा खूप दिवसांनी छान छान गोष्टी ऐकल्या. अशोक सराफ यांनी वाचलेली जग्गू आणि पावट्याचा वेल ..सगळ्यात आवडती गोष्ट. का कुणास ठाऊक? त्या गोष्टीतल्या जग्गूचा पावट्याचा वेल कसा काय वाढत जात असेल आणि मग तिकडे राक्षसाचं घर कसं असेल, राक्षसाच्या राजाची जादूची कोंबडी, देतेस का मला चार सोन्याची अंडी ? असं…
-
गणूची तिसरी गोष्ट: गणपती
गणूची तिसरी गोष्ट : गणपती गणूला खूप खूप गोष्टी आवडतात. सकाळी उठून आजीच्या मांडीवर बसून राहायला आवडतं. खिडकीत बसून फुलांकडे बघत बसायला आवडतं. कणकेचा गोळा घेऊन सूर्य बनवायला आवडतो. मित्राबरोबर दंगा करायला आवडतो. सुपर हिरो बनून शहराला वाचवायला आवडतं. कधी कधी नुसतंच भांडायलाही आवडतं. खूप बडबड करून मोठी गोष्ट रचायला…
-
गणूची दुसरी गोष्ट : खडू
गणूच्या गमतीजमती कध्धी संपत नाहीत. त्याचं रोज काहीतरी नवीन चालू असतं, त्यातून तो नव्यानं शिकत असतो आणि आनंद मिळवत असतो. कालपरवा कुठेतरी वाचलं, लहान मुलं लवकर का झोपतात किंवा त्यांना कमी वेळात अधिक झोप का घ्यावी लागते? तर त्याचं उत्तर असं की त्यांना दर क्षणाला नवं काहीतरी शिकायला मिळत असतं,…
-
गणूची पहिली गोष्ट : कावळोबा
सध्या वेगवेगळ्या प्रकारचं भाषेशी संबंधित काम करीत असताना विना जोडाक्षर गोष्ट किंवा परिच्छेद लिहिण्याची संधी मिळाली. त्यानिमित्ताने गोष्ट लिहिण्याचा केलेला हा एक प्रयत्न. इंग्रजी माध्यमाच्या मुलांना मराठी ची ओळख तर करून देता येईलच पण सध्या मराठी शाळेतही शुद्ध स्वच्छ स्पष्ट लेखन वाचन करताना मुलं दिसून येत नाहीत. त्यांच्यासाठी हे सोप्या…