Category: कविता
-
पाठीवर दप्तर हे….
कवी अनिल यांच्या ‘वाटेवर काटे…’ या कवितेचे विडंबन पाठीवर दप्तर हे…. पाठीवर दप्तर हे घेऊन चाललो चाललो जसा तुरुंगात चाललो | अडकवून पाठीशी कधी, डोक्यावर लटकवून कधी आपलीच मान मोडून चाललो | शाळेचा डबाही आत, रेनकोट-छत्रीही त्यात मनाशीच हुंदका देईत चाललो | सुटली बुटाची लेस, शाळेची दूर वेस निसटता…
-
मला काहीच येत नाही……….
मला पोळ्या येत नाहीत मला भाजी येत नाही मला लाडू, चिवडे, जॅम करून डबेही भरता येत नाहीत! मला लोकांशी बोलता येत नाही मला मुलांशी खेळता येत नाही मला चालू असलेलं शांत बघत पुढेही जाता येत नाही! मला भांडी घासता येत नाहीत मला फरशी पुसता येत नाही मला नोकरी करून…
-
अजून तरी ….
अजून तरी सकाळी उठलं की तुझ्याकडे बघावंसं वाटतंय अजून तरी तुझ्याशी तासनतास बोलावंसं वाटतंय म्हणजे अजून तरी सगळं ठीकठाक चाललंय! अजून तरी तू चिडलास की शांत राहावंसं वाटतंय अजून तरी तुझं चिडणं समजून घ्यावंसं वाटतंय म्हणजे अजून तरी सगळं ठीकठाक चाललंय! अजून तरी तुला हवं नको ते पाहावंसं वाटतंय अजून…
-
तेव्हा गणित चुकतं!
नवऱ्यामुलीची बायको होते, गृहिणी होते……… तोवर सगळं ठीक असतं गृहिणीची भांडेवाली होते, तेव्हा गणित चुकतं! आपल्या मुलांत आपले रूप, गुण पाहात असतो……… तोवर सगळं ठीक असतं आपली पोरं म्हणजेच आपण असं जेव्हा वाटू लागतं, तेव्हा गणित चुकतं! आजीआजोबा नातवंडांबरोबर प्रेमानं वेळ घालवत असतात…….. तोवर सगळं ठीक असतं नात्याच्या दडपणाने ते…
-
मला भेटणारा रविवार……
संदीप खरे यांच्या एका कवितेमध्ये बदल करत ….. मला भेटणारा रविवार…… आता इतका सहज सरळ उगवत नाही रविवार सकाळ होताच म्हणतो, आज आठवडी बाजार ! कर्तव्यागत उठतो आम्ही, नेमे शिजते भाजी कर्तव्यागत डोक्यावरती, भरून घेतो ओझी! पोहे-पॅटीस जातात दूर कुठल्या कुठल्या गावा शहाण्यासारखा पडून असतो रोजचा पेपर नवा! रविवारचं कौतुक…
-
जी जात नाही ती ….
बरं असतं लहानपणी विशेष काssही कळत नाही जात धर्म पंथ यातला फरक बिरक वळत नाही सगळेच असतात मित्र मित्र, सगळेच असतात आपले आपले खराss तो एकची धर्म म्हणत, घालत असतात साकडे-बिकडे हळूहळू मग मनावर संस्काssर वगैरे होऊ लागतात कळत नकळत; “त्यांच्या बाप्पाला नसतात तीन डोकी” “त्यांच्या बाप्पाचा रंग निळा नसतो”…
-
असते तरी….नसतेच
चेहऱ्याला नाव असते, पण नावात काहीच नसते गाण्यात सम असते, पण समेवर गाणेच नसते शास्त्राला नियम असतो, पण नियमाला शास्त्रच नसते पाणी हेच जीवन असते, पण पाण्याला चवच नसते विचारांना म्हणे गती असते, पण गतीला विचारच नसतो रंगाचे मूळ पांढऱ्यात असते, पण पांढरा मुळी रंगच नसतो दाहीदिशांना वाट…
-
प्रिये चहा
प्रिये चहा, रात्रीचा समय सरता दे तू बेड टी मला…. प्रिये चहा आल्याचा वास सुटत दालचिनी नाममात्र निद्रा मम दूर करत हाती हवे चहा पात्र…..प्रिये चहा बाल्कनीत खूर्ची उभी मोबाईल निवांत जगी रविवासर संपल्याची जाणीवही जावो लया….प्रिये चहा आळसात पसरुनिया गेला जो वेळ अहा स्थिती मम ही बदलाया उठलो की पुन्हा…
-
जsssरा काही झालं की…..
परवा काय झालं, फोनवर बोलता बोलता एकीनं मला विचारलं, जsssरा काही झालं.. की लिहायला हवं का? मी म्हटलं, हो, लिहायला हवं. पावसाची चाहूल लागली की पाउल खिडकीपाशी वळायला हवं. किती गप्प बसशील मना, बरसायचं कधी? हे आता तुला कळायला हवं. जुन्या कागदांची पोतडी दिसली की तासभर तिच्यापास बसायला हवं.…