Category: Marathi Content
-
चहा म्हणजे चहा म्हणजे चहा असतो…
(कवी मंगेश पाडगावकर यांच्या ” प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं” या कवितेचे विडंबन) चहा म्हणजे चहा म्हणजे चहा असतो.. कितीही कुठेही मिळाला तरी तो हवा असतो.. काय म्हणता? या ओळी खोट्या वाटतात? द्रव्याच्या दृष्टीने चिल्लर वाटतात? वाटल्या तर वाटू दे, आटल्या तर आटू दे! तरीसुद्धा, चहा म्हणजे चहा…
-
नावातली गंमत
नाव, नावात काय असतं… असं म्हटलं तरीही नावात बरंच काही असतं राव.. असं कसं? तेवढी एकच तर गोष्ट आहे जी आपण जन्मापासून मरेपर्यंत आपली म्हणून सांगतो, बाळगतो, ओझं म्हणून वाहतो किंवा मुकुट म्हणून मिरवतो. ते कधी ओळख होतं..हवीहवीशी, नकोनकोशी, कधी एखाद्या स्पर्धेतला विजय होतं तर कधी पराजय, कधीतरी असतं नुसतं…
-
जित्याची खोड ….दुसरं काय ….
कसं आहे ना… एखादी नवी गोष्ट केली …समजा नवं पुस्तक वाचलं, नवीन नाटक पाहिलं, सिनेमा बघितला, ते अगदी नवीन जागा बघितली….की त्या अनुभवाचा पार चेंदामेंदा करून चर्चा करकरून भुस्कुटं पडेपर्यंत परीक्षण, विश्लेषण करायची सवय असते काहींना…..जित्याची खोड हो दुसरं काही नाही … तर त्या स्वभावाला अनुसरून गेली काही वर्षे ज्यांचे…
-
पाळीव ..छे:..पालीव प्राणी !
जगात किती वेगवेगळ्या प्रकारचे लोक बघायला मिळतात; प्राण्यांना पाळणारे, त्यांना सर्कशीत अथवा संग्रहालयात ठेवणारे किंवा त्यांना घाबरणारे आणि त्यांना संग्रहालयात बघून फुशारक्या मारणारे. प्राण्यांना खाणारे…आपण या लेखापुरते जरा बाजूला ठेउया. मला कित्येकदा प्रश्न पडतो … मुद्दाम कुत्री, मांजर, ससे, कासवं, मासे, कीटक, असे प्राणी पाळणारे लोकं नक्की काय…
-
धडधडीत खोटं
(whatsapp नावाचं एक विध्वंसक app वापरणाऱ्या दोन व्यक्ती एकमेकांशी बोलत आहेत. एक दिवस कोण, कोणाला, कधी, काय, किती खरं आणि खोटं बोललं यावरून त्यांचा झालेला हा सु?संवाद. अर्थात हा संवाद video call वर घडतोय….समोरासमोर ….या दोघांचं वय अनुक्रमे २५ आणि ५० वर्षे….नातं काय असावं बरं.. वाचताना तुमच्या मनात येईल ते)…
-
आमचा गण्या हुश्शार बाई
आमचा गण्या हुश्शार बाई …. मार्क तो मिळवितो …. अस्से मार्क सुरेख बाई …. डिग्र्या तो कमवितो …. अश्श्या डिग्र्या कम्माल बाई …. नोकऱ्या त्या दिलविती …. अश्श्या नोकऱ्या कडक बाई …. प्रतिष्ठा त्या दाखविती …. असली प्रतिष्ठा भन्नाट बाई …. परदेशी जी धाडिते …. अस्सा परदेश सुसज्ज बाई ….…
-
स्थिरावत चाललेले बदल
काही दिवसांपूर्वी भारतातून साता समुद्रापार वगैरे म्हणतात तसा जाण्याचा योग आला…खरे दोन समुद्र बघायला मिळाले…असो…मुद्दा असा की अगदी तयारी सुरु झाली तेव्हापासूनच बदल डोक्यात आणि अंगात भिनायला सुरुवात झाली…त्यासाठी नेमक्या वस्तू, ब्यागा, त्यांची वजनं, तिकीट, कार्ड ई ची घोकंपट्टी हे लौकिक आणि मनात वाटत काय होतं हा एक अलैकिक बदल…
-
कुठे जातोय आम्ही ….
गेल्या आठवड्यात whats app वर सुगरण नावाचा एक लेख वाचनात आला. लेखिका अज्ञात. साधारण सारांश असा की हल्लीच्या मुलींनी स्वयंपाक करता येत नाही याविषयी त्यांना काहीही वाटत नाही आणि उलट त्या; ज्या बायका घरी जेवण बनवतात त्यांच्याविषयी आश्चर्य व्यक्त करतात. तर यात काही कौतुकास्पद गोष्ट नाही. हल्लीच्या मुलींनी स्वयंपाक शिकायला…
-
Internetबिंटरनेट
आजकाल आपला मोबाईल हातात घेतला की खूप कम्माल काहीतरी करतोय असं वाटायला लागतं. आता याला कारण काय असावं? एक तर त्यावर अखंड काहीतरी घडत असतं आणि त्यासाठी आपण स्वतः काही करावं लागतंच असं काही नाही ….हं smartphone नावाचं एक वेड विकत मात्र घ्यावं लागतं. या smartphoneवर अनंत apps असतात ज्यांना…
-
आता बघच तू……
(रविवारचा दिवस, सिद्धार्थ आणि त्याचे आई-बाबा दिवाणखान्यात बसलेले आहेत. आई-बाबा एकीकडे चहाचा एक घोट घेत दुसरीकडे पेपरची पान चाळत आहेत. सिद्धार्थ टीव्ही बघत बसलेला आहे.) सिद्धार्थ: अहाहा …what a life!!! आई: का काय झालं विशेष? सिद्धार्थ: रात्री एक movie बघितलाय, सकाळी सकाळी टीव्ही लाऊन बसलोय ..आणि तरीही तू ..उठ..आवर…आंघोळ कर…