Category: Marathi Content
-
बर्थडे पॅरॅडॉक्स
एक दिवस मी आणि राजीव गप्पा मारत असताना योगायोगाच्या काही गोष्टींची योगायोगाने चर्चा झाली. विषय होता; ‘बर्थडे’. हल्ली बर्थडेच्या दिवशी गुगल डूडल तुम्हाला हॅपी बर्थडे विश करते. ते बघून वेगाने प्रगत होत चाललेल्या technology बद्दल बोलत होतो. मग विषय तसाच पुढे गेला तो थेट number theory पर्यंत जाऊन पोहोचला. तेव्हा…
-
निमित्त..कट्यार..
चित्रपट ‘कट्यार काळजात घुसली’..खरं तर याला चित्रपट म्हणावं की ‘संगीतिका’? असा प्रश्न मनात आला. कारण मी बघितलेला चित्रपटाचा आत्मा सशरीर ‘संगीत’ असण्याची ही पहिलीच वेळ. यू ट्युबवर ज्यूकबॉक्स द्वारे उपलब्ध असलेली या चित्रपटातील गाणी ऐकली. त्यानंतर काही गाण्यांचे व्हिडीयो बघितले. क्वचित असंही वाटून गेलं की आता…
-
सगळं पाहिजे इम्पोर्टेड
वैदेही आणि अपूर्वा बऱ्याच दिवसांनी भेटल्या. वैदेहीचे कामानिमित्त सतत परदेश दौरे आणि अपूर्वाचा संसार एके संसार; त्यामुळे या जीवश्च कंठश्च मैत्रिणींना आज काल भेटायला वेळच होत नव्हता. खूप दिवसांनी परवा गाठ पडली आणि नेहमीच्या विषयावर गाडी आली. “काये नं, क्वालिटी नाही गं आपल्याकडे.” नेहमीप्रमाणे वैदेही रडली. त्या दिवशी का कुणास…
-
सायकल, मेणबत्ती आणि पाडगावकर
दोन पायांची चाकं जसजशी पटापट उचलता येतात तसतसं वेगाचं वेड लागतं. आपण पळायला सुरुवात करतो. आणखी वेग हवासा वाटतो, आणि सायकल नावाच्या वाहनाशी ओळख होते. सायकलवर टांग टाकून कमीत कमी वेळात एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्याचे वेध लागतात. आपला वेग जसा वाढतो तसा चेहऱ्याला हवेची निराळी मजा कळते.…
-
एक नाट्यमय अनुभव
काही घटनाच अशा असतात ज्या नाट्यमय असतात तर काही घटना अगदी सरळ साध्या असतात पण आपला त्याकडे बघण्याचा दृष्टीकोण अतिशयोक्त असतो. ही अशी एखादी गोष्ट आपण आपल्या कट्ट्यावर त्याच अभिनिवेशात सादर करतो आणि तयार होतो तो ‘किस्सा’. मग तो एखाद्या अनोळखी व्यक्तीने हॉटेलमध्ये परवा काय गोंधळ घातला,…
-
ही आवडते मज मनापासुनी शाळा ….
“ही आवडते मज मनापासुनी शाळा” असं म्हणावंसं वाटायचं, तेही मनापासून. शाळेत काय काय शिकलो यापेक्षाही शाळेनं मला काय काय दिलं असं मी म्हणू शकेन. शाळेची इमारत, क्रीडांगण, प्रयोगशाळा हे तर अजूनही आठवतच पण तितकेच काही शिक्षकही आवर्जून आठवतात. ज्यांनी प्रेमाने पाठीवरून हात फिरवला तेही आणि ज्यांनी पूर्ण वर्गासमोर…
-
कोणाचं काय तर कोणाचं काय……
कोणी म्हणतात; चला, गेल्या वर्षातला हा शेवटचा दिवस; नवीन वर्ष काय काय घेऊन येतंय बघायचं. कोणी प्रचंड आत्मविश्वास असणारे म्हणतात; वर्ष असावं तर असं! वाह! पुढचं वर्ष पण असंच झकास असणार! कोणी म्हणतो; छे! कसलं काय? वय वाढतंय नुसतं बाकी काही फरक नाही. कोणी म्हणतो आज केक खाऊन मजा करू,…
-
गोष्ट एका टॅणूण्याणूची
टॅणूण्याणू म्हणजे? दिव्याच्या गाड्या! आपला आगीचा बंब असतो नं, म्हणजे अग्नीशामक दलाची घंटा वाजवत जाणारी गाडी तशाप्रकारच्या थोडक्यात आवाज करत जाणाऱ्या गाड्या. माझा मुलगा जेव्हा गाड्या ओळखायला लागला तेव्हा त्यानं पहिल्यांदा हा शब्द वापरला. आधी हा शब्द फक्त अमब्युलन्स पुरता मर्यादित होता पण त्यानंतर जसजसे इतर हॉर्न्स /…