Category: Marathi Content
-
चाकोरीबाहेरचं inside the box
out of the box अर्थात चाकोरीबाहेरचा वेगळा विचार, वेगळी कृती, वेगळ्या वस्तूंची निर्मिती, नवीन काहीतरी देण्याचा व्यापारी कंपन्यांचा प्रपंच चालू असतो. Drew Boyd व Jacob Goldenberg यांच्या ‘inside the box’ या पुस्तकातून मात्र ते उलट्या दिशेची ओळख करून देतात. या लेखकद्वयीचा असा विश्वास आहे की जगभरात ज्या नाविन्यपूर्ण वस्तू, कृती…
-
Fantastic वीकेंड
वीकेंड fantastic असतोच पण त्यातही तेव्हा जर खूप वर्षानी मित्र मैत्रिणी भेटायला आले, त्यांच्याशी गप्पा मारल्या, उकरून उकरून जुनी भांडणं केली की मग एकदम दिवस जिवंत वाटतात. दिवसाच्या शेवटी त्यांनी आपल्या आवडीचं एखादं पुस्तक हातात द्यावं आणि सोबत मुलालाही आवडेल असं गिफ्ट, मग तर काही विचारायलाच नको. नवऱ्याला सुट्टी, मुलगा…
-
प्रिये चहा
प्रिये चहा, रात्रीचा समय सरता दे तू बेड टी मला…. प्रिये चहा आल्याचा वास सुटत दालचिनी नाममात्र निद्रा मम दूर करत हाती हवे चहा पात्र…..प्रिये चहा बाल्कनीत खूर्ची उभी मोबाईल निवांत जगी रविवासर संपल्याची जाणीवही जावो लया….प्रिये चहा आळसात पसरुनिया गेला जो वेळ अहा स्थिती मम ही बदलाया उठलो की पुन्हा…
-
कवितेच्या नादात….
कवितेचा जन्म व्हायला हातात पेन असावंच लागतं टेबलवर डायरी आणि कॉफीच्या मगाला स्थान लागतं ऋतूनीही बदलायचं असतं, कधी ऊन कधी पाउस हवा-पाणी बदलावं लागतं नुसती पुरत नाही हौस खूप काहीतरी घडावं लागतं अपघातानं वा आग्रहानं किंवा भांडणही पुरतं सुचतं बरंच मानापमानानं स्मृतींच्या आडवळणी रस्त्यात मग मनाला सोडायचं मार्ग दिसावा म्हणून…
-
(इनोव्हेशन) नाविन्य भाग ३
कृत्वा नवदृढसंकल्पम्……. दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, प्रसन्नता, चैतन्य. पाहावं तिकडे उजेडाचं, प्रकाशाचं, तेजाचं साम्राज्य. अशा दिवसांत संध्याकाळी अंधार पडला की घराघरातून डोकावणारे सूर्याची ही लहानशी प्रतिकं बघितली की मला कायम एका शास्त्रज्ञाची आठवण येते. तो म्हणजे थॉमस एडिसन; ज्याने इलेक्ट्रिसिटीवर चालणारा बल्ब शोधून काढला. याच शास्त्रज्ञाची आणखी एक गोष्ट, त्याने…
-
भौमितिक दिवाळी
शाब्दिक दिवाळी, सांगीतिक दिवाळी, पौष्टिक दिवाळी तशीच एक भौमितिक दिवाळी. कंपास, कर्कटक, कोनमापक, सहा इंची पट्टी, टोक केलेली गुळगुळीत शिसाची पेन्सिल, खोडरबर, सोबत कागद म्हणजे दिवाळी. समांतर रेषा, त्रिकोण, चौकोन, पंचकोन, लंबदुभाजक, कोनदुभाजक, आंतरवर्तुळ यांनी सजलेलं टेबल म्हणजे दिवाळी. x आणि y यांच्याबरोबर z ऍक्सिसने दुपारभर सहजपणे ५,३,२, खेळायला येऊन…
-
जsssरा काही झालं की…..
परवा काय झालं, फोनवर बोलता बोलता एकीनं मला विचारलं, जsssरा काही झालं.. की लिहायला हवं का? मी म्हटलं, हो, लिहायला हवं. पावसाची चाहूल लागली की पाउल खिडकीपाशी वळायला हवं. किती गप्प बसशील मना, बरसायचं कधी? हे आता तुला कळायला हवं. जुन्या कागदांची पोतडी दिसली की तासभर तिच्यापास बसायला हवं.…
-
#आज अचानक
गेल्या काही महिन्यांपूर्वी ‘अचानक’ या शब्दाचा अर्थ मला नव्याने नुसता कळला असं नाही तर अनुभवायलाही मिळाला. काय गंमत असते? आपण एखादी गोष्ट जेव्हा ठरवून करतो आणि ती जमते तेव्हा आनंद होतोच. पण जर अशी एखादी गोष्ट अनपेक्षित असताना करायला मिळाली आणि थोड्याफार प्रमाणात ती मनासारखी करता आली तर…
-
(इनोव्हेशन) नाविन्य भाग २
इनोव्हेशनची सुरुवात घरापासून … सध्या आपण जे म्हणू ते आपल्याला मिळतंय. नवीन वही, नवं पुस्तक, नवी सायकल, नवा खेळ, नवा टीव्ही, नवं घड्याळ, नवे कपडे अगदी काय वाट्टेल ते आपल्याला मिळू शकतं. जर सगळंच उपलब्ध असेल तर काय नि कशाचा शोध लावणार आणि कुठलं इनोव्हेशन करणार? आपल्याकडे अशी कुठली…