Category: ललित
-
मज लोभस हा इहलोक हवा
जगण्याची अतोनात इच्छा असावी तर बा भ बोरकरांसारखी, स्वर्ग न मागता ते इहलोक मागतात, इथला हर्ष न शोक त्यांना हवासा वाटतो. शंतनुचा मोह, ययातिचा देह न् पार्थाचा संदेह ते मागतात. इंद्राचा भोग आणि चंद्राचा ह्रुद्रोग हवा असतो, सुखाची अपेक्षा करत असताना दुःख दे आणि सोसायचे धैर्य दे म्हणून ते थांबत…