Category: रसास्वाद
-
डॉ. आयडा स्कडर

वीणा गवाणकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेलं हे व्यक्तीचित्रण. आई-वडील मिशनरी म्हणून भारतात काम करत होते.. ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी दक्षिण भारतात काम. तिथल्या लोकांना वैद्यकीय सेवा पुरवणे आणि होता होईल तो धर्माचा प्रसार करणे हा त्यांचा हेतू. आयडाही अगदी लहान असताना त्यांच्याबरोबर भारतात होती. पण प्रचंड दुष्काळ पडला आणि या…
-
जॉनाथन स्ट्राऊड आणि ऍम्युलेट ऑफ समरकंड

जे.के. रोलिंग चं हॅरी पॉटर वाचून झाल्यावर जादुई जगतातील अजून काही वाचावं का नाही…हे नक्की कोडं आहे…पण तरीही… जॉनाथन स्ट्राऊड याचं ऍम्युलेट ऑफ समरकंड हातात आलं… आणि तेही तितकंच रंजक असल्याचं जाणवलं. या पुस्तकात जादुई जग हे सामान्य जगाचा एक भाग आहे इतकंच नव्हे तर ते कुठेतरी ब्रिटनचा कारभारही चालवत…
-
बोक्या सातबंडे

बोक्या .. नावातच काहीतरी उचापती किंवा मस्ती करणारा हा मुलगा असणार हे आलंच. दिलीप प्रभावळकर लेखणीतून अवतरलेल्या या पात्राबद्दल किती बोलावं तेवढं कमीच आहे. हे पात्र शेंडेफळ, दंगेखोर, जरा आगाऊच पण हुशार, धाडसी, लोकांना मदत करण्यासाठी धावून जाणारा आणि नितांत लाघवी, संवेदनशीलही आहे. मित्राने पाळलेल्या प्राण्यांची काळजी घेताना गोंधळ घालणारा…
-
काव्य वाचन…

१. गझल उपदेशाचा: विंदा करंदीकर २. झाले हवेचेच दही: बा.भ.बोरकर ३.काळी बाभूळ सांगते: यशवंत पारखी ४. थेंब धारेचा होऊन: इंदिरा संत ५. पत्र लिही पण: इंदिरा संत ६. स्वार: कुसुमाग्रज ७. ते एक झाड आहे: शांता शेळके ८. संजीवनी बोकील ९. चुकले का हो: इलाही जमादार १०. सफरचंदाचे ना फक्त…
-
शिरवाडकरांच्या विनोदी कथा

परवा कथेच्या पुस्तकाचा शोध घेत असताना हे पुस्तक दिसलं. वि. वा. शिरवाडकर यांच्या विनोदी कथा. कवी कुसुमाग्रज आणि नटसम्राटचे नाटककार शिरवाडकर या पुस्तकात भेटले ते भलतेच निवांत लेखक म्हणून. साधी सरळ भाषा तितकेच साधे सरळ विनोद. या पुस्तकात पंधरा वेगवेगळ्या कथा आहेत, विषयही वेगवेगळे. हो, अगदी साधे सोपे. मुळात उत्कृष्ट…
-
गूढ आणि गंभीर जी ए: पिंगळावेळ

कॉलेजमध्ये असताना जीएंचं लेखन आणि त्याबद्दलही खूप ऐकलं. ते मुद्दाम वाचायला मात्र घ्यावंसं वाटलं नाही कारण ते कायमच गूढ, अनाकलनीय वाटत राहिलं. सध्या त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने बरेच कथावाचनाचे कार्यक्रम होताहेत. तेव्हा घरात असूनसुद्धा न वाचलेलं पुस्तक जरा वाचून तरी बघूया म्हणून खरं तर वाचायला घेतलं. पिंगळावेळ: कथांचं पुस्तक…. दीर्घ कथांचं.…
-
विंदांच्या कवितांचे वाचन
गेल्या महिन्यात आम्ही कॉलेजमध्ये असताना सादर केलेला विंदांच्या कवितांचा कार्यक्रम पुन्हा एकदा केला…आता कविता थोड्या वेगळ्या पद्धतीने भेटल्या आणि बरोबर आमची बच्चेकंपनी… एक वेगळा अनुभव या काव्यवाचनाचे व्हिडिओ शेअर करतेय, Part 1. लहान मुलांनी सादर केलेल्या कविता:- https://youtu.be/Wp-vdLqJaxo Part 2. https://youtu.be/34XIGdHU3EE Listen to Vindanchi Kavita – Shevatcha ladu.m4a by नंदिता…
-
द फेमस फाइव्ह

माझं स्वतःचं शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं असल्यानं मुलांना पुस्तकं वाचायला देताना आधी मी ते वाचून मगच त्यांना देते. तशी टिनटिन चा फडशा पाडल्यानंतर भेटली ही एनिड ब्लायटन. द फेमस फाइव्ह ही तिने लिहिलेल्या मुलांच्या साहसकथांची मालिका आहे. या कादंबऱ्यांमधील प्रमुख पात्रे आहेत, जॉर्ज, डिक, अॅन, ज्युलियन आणि जॉर्जचा कुत्रा…
-
बधाई हो बधाई

अमित शर्माने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट. आजकाल असे ही म्हणजे टिप्पीकल गाणी, मसाला स्टोरी नसलेले चित्रपट सुद्धा येतात आणि बॉक्स ऑफिसवर चांगलं यशही मिळवतात. अर्थात प्रेक्षकही चोखंदळ झाले आहेत असं म्हणूया. आयुष्यमान खुराना, सान्या मल्होत्रा, नीना गुप्ता, गजराज राव, सुरेखा सीकरी, शीबा चड्ढा अशी हटके चित्रपट करणार्या कलाकारांच्या अभिनयाने सुरेख…
