Category: ललित
-
लाटाच लाटा
निळाशार समुद्र आणि त्याचं अथांग अस्तित्व. त्याची उसळलेली लाट जमिनीपर्यंत पोहोचावी न मग त्याच्या व्यक्तित्वाची जाणीव भुईला व्हावी. लाटेलाटेतून होत आसावा संवाद नभाचा नि भुईचा. या लाटांतून आकंठ जगावं या भूमीनं आणि उकलीत जावं कोडं या विश्वाचं. कधी उंच लाटा कधी मध्यम लाटा. कधी वेगवान लाटा कधी संथ लाटा. कधी…
-
आजीची पत्रं
लहानपणी आपण कसे गंमतीदार वागतो, कोणी गावाहून आलं की लगेच मला काय आणलंय? आई भाजी घेउन येतेय तर माझ्या आवडीची आणलीस का? असं आपलं टुमणं चालूच असतं. याच ‘मला काय आणलंय’ या भानगडीत एक दिवस भर पडली ती आजीच्या पत्राची. बाबा पोस्टाच्या पेटीतून कागदपत्र…
-
फोर व्हीलरशी ओळख..२
‘रस्त्यावर किती गर्दी असते, मुलाला मागे बसवलं नं की तो रडतो आणि म्हणतो, आईनी कार नाही चालवायची, हो; आणि पार्क करायला जागा कुठे असते आजकाल छे..’ असे अनेक विचार माझ्या कार-ड्रायव्हिंगच्या आड येत गेलेले आहेत. मीही अगदी इमानदारीत ते मान्य करून जमेल तितके वेळा कार ड्राईव्ह करणं टाळतही आलेय. नकोच…
-
फोर व्हीलरशी ओळख..१
फोर व्हीलर चालवता येणं, न येणं ही गोष्ट आपल्या आत्मविश्वासाची चांगलीच परीक्षा घेऊ शकते. लहानपणापासून सायकल, गियर्ड किंवा विदाउट गियर्ड व्हेहीकल चालवू शकू किंवा नाही हा प्रश्न कधीच पडला नाही. पण चारचाकीविषयी मात्र मला कायम संभ्रम होता. खरं पाहता चारचाकी घरी आली तेव्हाचा माझा उत्साह अवर्णनीय होता असं आठवतंय. स्वर्गाला…
-
सुट्ट्या
‘तुम्हाला केवढ्या सुट्ट्या असतात आमचं तसं नाही आम्हाला मोजून इतक्या इतक्या सुट्ट्या असतात. मजाय तुमची!!’ ‘काय नं सुट्ट्या मिळत नाहीत अग त्यामुळे माझं हल्ली इंडियाला जायचं ठरवताच येत नाहीये इत्यादी इत्यादी’ तर ‘सुट्ट्या’ या विषयावर परवा बोलत होतो तेव्हा आमचे एक मित्रश्रेष्ठ म्हणाले ‘वाढदिवसाला सुट्टी मिळायला काय बालवाडी आहे का?…
-
आशावायु….
तुम्ही फेसबुकवर आपल्या मित्रमैत्रिणींनी त्यांचं एक विचित्र स्टेट्स शेअर केलेलं वाचलं आहे का? त्यात लिहेलेलं असत की तुमचं मृत्यू कधी होणार आहे आणि कशा पद्धतीने. मी वाचलंय काहीजण म्हणे अपघाताने तर काही दुर्धर आजाराने मरण पावणार आहेत. मग काहीजण जे आत्ता ५० वर्षांचे आहेत ते अजून ८० वर्ष जगणार आहेत…
-
आज्जीबाईच विनर
काही काळ काही आवाज आपल्याला कसे लख्ख आठवतात ना अगदी कितीही वेळ उलटून गेला तरी. ते दिवस आपण मनात पुन्हा जगू शकतो आणि काही आवाज आपल्या कानात ऐकूही शकतो. त्यात कधी एखादा कम्माल अनुभव असतो तर कधी एखादी दुखरी आठवण. एखाद्या विक्षिप्त माणसाला भेटल्याचा प्रसंग असतो तर कधी…
-
कठीण समय येता
एक भव्य सभागृह. त्यात कित्येक आसनं. त्यावर स्थानापन्न झालेले अनेक दिग्गज भारतीय नेते. समोरच्या बाजूला उच्चासन ज्यावर संसदेत स्पीकर बसतात ते. या उच्चासनावर एक दूरदर्शक आहे. टीव्ही म्हणूया आपल्या कल्पनेसाठी. कारण हे सभागृह आहे स्वर्गातलं. समोर सर्व भारतीय नेतेमंडळी बसलेली. स्वतःसाठी नाही तर देशाच्या भल्यासाठी झटलेली. देशाच हिताहित काय झालं…
-
भटो भटो…कुठे गेला होतात?
परवा मोबाईल स्क्रीनवरून भटकत भटकत मी एका फोरमवर पोहोचले. त्यात चर्चा चालू होती लहान मुलांच्या गाण्यांबद्दल. या फोरमवर बऱ्याचशा मराठी मुली ज्या परदेशी राहतात व ज्यांची मुले लहान आहेत अशा मिळून साऱ्याजणी जुनी गाणी शेअर करीत होत्या. कोणी अटक मटक चवळी चटक, कोणी अबडक खबडक घोडोबा, इथे इथे बस रे…