Category: ललित
-
रीकन्स्ट्रक्शन … इमारतीचं की मनाचं
रिकन्स्ट्रक्शन होतंय ही खरं तर काही फार वेगळी घटना राहिलेली नाही, पण आपण ज्या घरात तीस चाळीस वर्ष राहात होतो ती जागा सोडून दुसरीकडे जायचं हे जरा कठीणच जातं. फार पूर्वीच्या काळापासून मंजे अगदी वसाहती निर्माण झाल्या तेव्हापासून जुन्याचं नवीन करत असेलच ऐतिहासिक माणूसही. असो, तर तसंच आमच्याही घराचं रिकन्स्ट्रक्शन…
-
मृदुला….
आठवणी कायम गोड छान मनापासून जपाव्या जगाव्या अशाच असतात अशी ठाम समजूत असते आपली, जिवंतपणे जगलेले कितीक क्षण उराशी बाळगून एकेक नवा दिवस उगवत असतो आणि तोही नव्या ताज्या उमेदीनं जगायचं बळ देत असतो. पण एखादा दिवस असा असतो जो माणसाला खाड्कन जमिनीवर नेऊन आदळतो. तुझ्या हातात काहीही नाही, काही…
-
बाबांची बदली … पाच पेडी
मला ना, बाबांच्या ऑफिसचा खूप म्हणजे खूप राग येतो. काही वेळा तर वाटतं, ऑफिस बंदच पडलं तर किती छान होईल. बरोबर खेळायला, फिरायला, गप्पा मारायला मारामारी करायला बाबा घरी. सारखं आपलं अरे बंडू, त्यांना त्रास देऊ नकोस, ऑफिसला निघालेत, त्याला कशाला हात लावलायस अरे, ते ऑफिसचे कागद आहेत. छे:! काही…
-
कॅलिफोर्निया … २
कॅलिफोर्नियाला गेला तर सॅनफ्रॅन्सीस्को मधील गोल्डन गेट ब्रिज आणि गोल्डन गेट पार्क आवर्जून बघावी अशी दोन ठिकाणं. आपण जर ‘पार्क मध्ये काय बघण्यासारखं असणारे, किंवा असून असून पार्क किती मोठीशी असणारे, अशा संकल्पनेत या पार्कमध्ये गेलो तर आपली निश्चित फजिती होऊ शकते. या पार्कची जागा इतकी प्रचंड आहे की आपण…
-
कॅलिफोर्निया …१
कॅलिफोर्नीया मध्ये गेलं वर्षभर राहिले. त्या निमित्ताने आई बाबांना तिकडे बोलवून घेता आलं. यावेळी आई बाबांना आम्ही फिरवणार होतो. इतक्या वर्षात सर्वात प्रथम त्यांना मी त्यांना काहीतरी दाखवणार होते, या इथे ना ते हे आहे, तिथून तिकडे गेलं कि ते स्टोअर मग ही बाग, ती कंपनी, तो मॉल. खरं तर…
-
काय कधी कोणी कुठे ….. thats the way माही वे……
धोनी टेस्ट नंतर एकदिवसीय सामन्यांचं कप्तानपद सोडून देतोय……. ? पूर्वीचे captain चांगले होते, आताचा captain लईच भारी आहे वगैरे सगळं झालंच पण धोनी? धोनी धोनी आहे. कारण तो नुसता भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान नाहीये तर पूर्ण देशाला गर्व वाटावा असा एक कमालीचा नेता, व्यवस्थापक, दिग्दर्शक आहे. क्रिकेटच्या मैदानावर सलग चार…
-
कवितेच्या नादात….
कवितेचा जन्म व्हायला हातात पेन असावंच लागतं टेबलवर डायरी आणि कॉफीच्या मगाला स्थान लागतं ऋतूनीही बदलायचं असतं, कधी ऊन कधी पाउस हवा-पाणी बदलावं लागतं नुसती पुरत नाही हौस खूप काहीतरी घडावं लागतं अपघातानं वा आग्रहानं किंवा भांडणही पुरतं सुचतं बरंच मानापमानानं स्मृतींच्या आडवळणी रस्त्यात मग मनाला सोडायचं मार्ग दिसावा म्हणून…
-
भौमितिक दिवाळी
शाब्दिक दिवाळी, सांगीतिक दिवाळी, पौष्टिक दिवाळी तशीच एक भौमितिक दिवाळी. कंपास, कर्कटक, कोनमापक, सहा इंची पट्टी, टोक केलेली गुळगुळीत शिसाची पेन्सिल, खोडरबर, सोबत कागद म्हणजे दिवाळी. समांतर रेषा, त्रिकोण, चौकोन, पंचकोन, लंबदुभाजक, कोनदुभाजक, आंतरवर्तुळ यांनी सजलेलं टेबल म्हणजे दिवाळी. x आणि y यांच्याबरोबर z ऍक्सिसने दुपारभर सहजपणे ५,३,२, खेळायला येऊन…
-
#आज अचानक
गेल्या काही महिन्यांपूर्वी ‘अचानक’ या शब्दाचा अर्थ मला नव्याने नुसता कळला असं नाही तर अनुभवायलाही मिळाला. काय गंमत असते? आपण एखादी गोष्ट जेव्हा ठरवून करतो आणि ती जमते तेव्हा आनंद होतोच. पण जर अशी एखादी गोष्ट अनपेक्षित असताना करायला मिळाली आणि थोड्याफार प्रमाणात ती मनासारखी करता आली तर…