Category: रसास्वाद
-
संन्यस्त खड्ग
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेलं हे एक संगीत नाटक. भाषेचं माधुर्य सुयोग्य शब्दांच्या आणि समर्थ विचारांच्या पायावर उभं राहिलं की अधिकच खुलून यावं तशी ही एक विलक्षण कलाकृती ज्यात भाषेचं सौंदर्य आणि सामर्थ्य तर आहेच आहे पण याच विषयावरील वैचारिक उहापोह्देखील आहे. संन्यास व संसार याविषयीची मतमतांतरे व विरोधी दृष्टीकोण यात…
-
पिग्मॅलियन
‘पिग्मॅलियन’ या नाटकाचे नाटककार आहेत जॉर्ज बर्नॉर्ड शॉ. हे नाटक प्रथम सादर केलं गेलं १९१३ मध्ये. पिग्मॅलियन हे नाव आहे एका ग्रीक शिल्पकारचं, ग्रीक पुराणात असं म्हणतात की हा पिग्मॅलियन त्याच्या एका शिल्पाच्या प्रेमात पडला आणि ते शिल्प जीवित झालं. यावरून प्रेरित होऊन शीर्षक दिलं गेलं असावं. हे नाटक घडतं…
-
लहान मुलांसाठी Golden books
लहान मुलांना खूप चित्र असणारी पुस्तकं बघायला जशी आवडतात तशीच थोडी थोडी अक्षरओळख झाल्यावर त्यात लिहीलेलं वाचावं असंही वाटायला लागतं. मी पण असंच छानसं पुस्तक शोधताना एक पुस्तक हातात आलं ‘Little golden books’. ही लहान मुलांसाठीच्या पुस्तकांची एक मालिका आहे. ही पुस्तकं पार १९४२ पासून आजवर वाचली जात आहेत. त्यापैकी ३…
-
वाचून तर बघूया !
जे ऐकायला मिळू नये असं सध्या बातम्यातून सगळं ऐकायला आणि बघायला मिळतंय. स्वदेश, स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषा याविषयीचा असणारा सार्थ अभिमान चालू घडामोडी बघून अस्वस्थ करून सोडतो. त्यातूनच विवेकानंद, रामकृष्ण यांची आठवण होते. त्यानिमित्तानं शिवाजीराव भोसले यांनी विवेकानंद या विषयावर दिलेलं व्याख्यान ऐकलं. समाधान होईना म्हणून सर्च चालूच ठेवला. तर…
-
निमित्त..कट्यार..
चित्रपट ‘कट्यार काळजात घुसली’..खरं तर याला चित्रपट म्हणावं की ‘संगीतिका’? असा प्रश्न मनात आला. कारण मी बघितलेला चित्रपटाचा आत्मा सशरीर ‘संगीत’ असण्याची ही पहिलीच वेळ. यू ट्युबवर ज्यूकबॉक्स द्वारे उपलब्ध असलेली या चित्रपटातील गाणी ऐकली. त्यानंतर काही गाण्यांचे व्हिडीयो बघितले. क्वचित असंही वाटून गेलं की आता…
-
ग्यानबा तुकाराम ढॅण्टढॅण टॅण्टढॅण
ग्यानबा तुकाराम ढॅण्टढॅण टॅण्टढॅण – एलिझाबेथ एकादशीच्या निमित्ताने ‘खेळ मांडियेला येत्या बालदिनी’ म्हणत परेश मोकाशी यांनी त्यांचा ‘एलिझाबेथ एकादशी’ हा चित्रपट यंदाच्या बालदिनाच्या दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित केला आणि त्या चित्रपटाने खराखुरा बालदिन साजरा केला. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ सारखा एक उत्कृष्ट चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शकाकडून तशाच किंबहुना अधिकच अपेक्षा होत्या आणि या चित्रपटाने त्या…
-
प्रिय कुसुमाग्रज
!!श्री!! प्रिय कुसुमाग्रज, सादर नमस्कार पत्र लिहिण्यास कारण… खरं तर काहीच नाही…आणि म्ह्टलं तर खूप काही. तसा तुमच्याशी संवाद साधण्याची ही पहिलीच वेळ पण तुमचे ‘पाठीवरती हात ठेउन नुसते लढ म्हणा’ हे शब्द आमच्यासोबत आहेत ते अगदी बाकावर बसून पाठ्यपुस्तकातील कविता पाठ होईपर्यंत वाचली तेव्हापासून. तुमच्या कविता…