Category: पुस्तक परीक्षण
-
कोवळी उन्हे
महाराष्ट्र टाईम्समध्ये तेंडुुलकरांनी लिहिलेलं हे सर्वांग सुंदर सदर. हल्क-फुलकं हो, विजय तेंडुुलकर यांचंच पण हलकं फुलकं, बोलकं आणि जीवनावर निस्सीम प्रेम करणारं सदर. या पुस्तकात त्यांनी सदरात लिहिलेले निवडक लेख एकत्रित केले आहेत. त्यापैकी प्रत्येकच लेख मनापासून आवडलं. प्रत्येक लेख काही नं काही देऊन जाणारा, विचारांना चालना देणारा आहेच. ‘ठाकुरद्वारचे विठ्ठलराव…
-
आहे मनोहर तरी
8 मार्च, जागतिक महिला दिवस, हातात ‘आहे मनोहर तरी’ पुस्तकाचं शेवटचं पान आहे. नामी दिवस मिळाला आहे या पुस्तकाविषयी लिहायला. तशी या पुस्तकाची आणि माझी फार जुनी ओळख आहे. परंतु ती ओळख जरा नकारात्मकच असल्याने मी कधी या पुस्तकाकडे कधी वळले नाही. पुस्तक जेव्हा बाजारात आलं, तेव्हा सुनीताबाईनी लिहिलंय यापेक्षा…
-
The story of Toilets, Telephones & other useful inventions
शाळेचं स्वत;चं ग्रंथालय आणि तिथून स्वत:चं स्वत: पुस्तक ठरवून घरी घेऊन यायचं. हा किती सुंदर संस्कार आहे नं, आमच्या वेळी म्हणजे अगदी लहान शाळेत बाईच शाळेत पुस्तक वाचून दाखवत, घरी बिरी नेण्याची मजा नव्हती. मोठ्या शाळेत गेल्यावर मुली पुस्तकं खराब करतात म्हणून शाळेतून घरी न्यायला परवानगी आहे अशी जी पुस्तकं…
-
20,000 Leagues Under the Sea
ज्युल्स गॅब्रीयल व्हर्न या फ्रेंच लेखकाने अठराव्या शतकात लिहिलेली ही विज्ञानकथा. याने विज्ञान कथेच्या विश्वाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली असं म्हटलं जातं. अर्थातच, अशाप्रकारच्या कथांच्या वाचक वर्ग हा प्रामुख्याने असतो तो कुमार वयोगट. अकरा-बाराव्या वर्षी साहसी, धाडसी, शोध-विज्ञान कथा आपल्याला वाचायला नक्की आवडतात. ट्वेंटी लीग्स अंडर द सी, जर्नी टू…
-
रातराणी
१९६७-६८ साली तेंडूलकरांनी ‘माणूस’ या साप्ताहिकासाठी लिहिलेले हे सदर. कला क्षेत्रातील काही घटना, ठिकाणे आणि व्यक्ती यांवर लिहिलेले हे ललित लेखन. एखादी घटना अनुभवून तिचा आपल्या मनावर पडलेला प्रभाव, त्यामुळे निर्माण झालेली मनोवस्था म्हणूया किंवा त्या त्या घटनेबाबत, व्यक्ती वा थेट अगदी चित्रपटाबाबत त्या त्या वेळी काय वाटलं हे यातून…
-
तें दिवस
अगदी दिवाळीची सुटी सुरु होताना चार पुस्तकं हाती आलेली आहेत. आणि तीही विजय तेंडुलकर यांची. यापूर्वी तेंडूलकरांची नाटकं वाचलेली आहेत आणि सादर होताना पाहिलेली आहेत. ते नुसतं पाहता किंवा वाचताना निर्माण होणारी अस्वस्थता आणि अनंत प्रश्न यांत कितीतरी वेळ घालवलेला आहे. या लेखकाबद्दल आदर वाटतोच पण त्यांच्याबद्दल फार प्रश्न पडतात.…
-
पु. लं एक आनंदयात्री
दिवाळी अंकासाठी पु.लंवर लेख लिहायला जमेल का? विचारणाऱ्याचा प्रश्न ही बिलंदर होता. लिहिणार का पेक्षा जमेल का लिहायला हा खरा प्रश्न. वास्तविक पुलंचं लेखन मला खूप आवडतं असं म्हणणं आणि त्यांच्यावर एक लेख लिहिणं या दोन वाक्यातली तफावत गेल्या दहा दिवसात मला चांगलीच जाणवली. पण अखेर अवसान गोळा करून लिहिण्यास…
-
The Golden Gate
पुस्तक वाचायला हवय यार एखादं! नवं काहीतरी, वेगळं काहीतरी वाचायला हवंय असं कितीतरी वेळा वाटत असतं. तेच तेच विचार आणि त्याच त्याच चौकटीबाहेर पडण्याचा पुस्तक हा फार जवळचा मार्ग वाटतो मला. एककल्ली आणि फक्त बरोबर वाटणारे विचार धुवून पुसून आपली पाटी कोरी करण्यासाठी या लेखक कवींचे आभार मानावे तितके कमी…
-
मला भावलेले विंदा …
यंदाचं हे गोविंद विनायक उर्फ विंदा करंदीकर यांचं जन्मशताब्दी वर्ष. त्या निमित्ताने अवघा महाराष्ट्र या तत्व चिंतकाच्या साहित्याचं स्मरण, अभ्यास आणि आनंद घेऊ बघतोय. एखाद्याच्या साहित्यात विविधता असावी ती किती सर्वव्यापी, सर्वस्पर्शी… याचं विंदा हे एक समर्पक उदाहरण. ते पिशीमावशी आणि तिची भुतावळ या त्यांच्या बालकवितेतून, कुठेतरी आहे-नाही च्या बेचकीत…
-
देनिसच्या गोष्टी
सध्या माझा मुलगा चित्राच्या पुस्तकाकडून गोष्टीच्या पुस्तकाकडे वळतोय तसतसं लहान मुलांसाठी पुस्तकं शोधण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. काही दिवसांपूर्वी फेसबुक वर एका मैत्रिणीने शेअर केलेली पीडीएफ मिळाली. पुस्तक होतं ‘देनिसच्या गोष्टी’. मूळ पुस्तक रशियन भाषेत असून त्याचे मूळ लेखक आहेत विक्टर ड्रागुन्स्की. त्याचा मराठी अनुवाद केला आहे अनिल हवालदार यांनी.…