Category: चित्रपट परीक्षण
-
बधाई हो बधाई

अमित शर्माने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट. आजकाल असे ही म्हणजे टिप्पीकल गाणी, मसाला स्टोरी नसलेले चित्रपट सुद्धा येतात आणि बॉक्स ऑफिसवर चांगलं यशही मिळवतात. अर्थात प्रेक्षकही चोखंदळ झाले आहेत असं म्हणूया. आयुष्यमान खुराना, सान्या मल्होत्रा, नीना गुप्ता, गजराज राव, सुरेखा सीकरी, शीबा चड्ढा अशी हटके चित्रपट करणार्या कलाकारांच्या अभिनयाने सुरेख…
-
लेहर समंदर रे…
सुमित्रा भावे- सुनिल सुकथनकर यांचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘कासव’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी सोनी लाईव्ह वर उपलब्ध झाला. एक नितांत सुंदर चित्रपट, कथा, दिग्दर्शन, उत्तम अभिनय या सर्वच गोष्टींसाठी जरूर पाहावा असा. कोणत्याही पडद्याआड नसलेलीशी, आकंठ साधीशी, नितळ, निरागस आणि खरीशी, माझी तुमची प्रत्येकाची गोष्ट वाटावी अशी ही कथा. ‘मला…
-
भाई : व्यक्ती की वल्ली
खरं सांगायचं तर हा चित्रपट नक्की बघावा असं काही वाटलं नव्हतं. पु लंची पुस्तकं वाचली आहेत, त्यांना ऐकलं आहे,त्यांच्या याच व्यक्तीचित्रांवर आधारित गोळाबेरीज नावाचा एक चित्रपट मध्ये कधीतरी अला होता, तो फार उत्साहाने जाऊन पाहिलाही होता, पण तेव्हा बऱ्यापैकी निराशा पदरी पडली होती. त्यामुळे जन्म शताब्दीच्या नावाखाली ज्या थोरामोठ्यांनी कित्येक…
-
आजच्या खेळा यश द्या देवा!
किती समर्पक ओळी आहेत ना या! खरंच एखाद्या कलाकृतीसाठी कलाकारांनी केलेले अथक परिश्रम, त्या कलेची साधना प्रेक्षकांसमोर केवळ काही वेळ सादर करायची, त्यावरून त्या कलाकृतीला दाद मिळणार की नाही याची वाट बघायची, किती कठीण काम, पण याच प्रयोगाला खेळ म्हणून त्यासाठी रसिकप्रेक्षकांच्या आशीर्वादासाठी घातलेलं हे गोड साकडं. चित्रपटगृहात आज ‘बापजन्म’…
-
निमित्त..कट्यार..
चित्रपट ‘कट्यार काळजात घुसली’..खरं तर याला चित्रपट म्हणावं की ‘संगीतिका’? असा प्रश्न मनात आला. कारण मी बघितलेला चित्रपटाचा आत्मा सशरीर ‘संगीत’ असण्याची ही पहिलीच वेळ. यू ट्युबवर ज्यूकबॉक्स द्वारे उपलब्ध असलेली या चित्रपटातील गाणी ऐकली. त्यानंतर काही गाण्यांचे व्हिडीयो बघितले. क्वचित असंही वाटून गेलं की आता…
-
ग्यानबा तुकाराम ढॅण्टढॅण टॅण्टढॅण
ग्यानबा तुकाराम ढॅण्टढॅण टॅण्टढॅण – एलिझाबेथ एकादशीच्या निमित्ताने ‘खेळ मांडियेला येत्या बालदिनी’ म्हणत परेश मोकाशी यांनी त्यांचा ‘एलिझाबेथ एकादशी’ हा चित्रपट यंदाच्या बालदिनाच्या दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित केला आणि त्या चित्रपटाने खराखुरा बालदिन साजरा केला. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ सारखा एक उत्कृष्ट चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शकाकडून तशाच किंबहुना अधिकच अपेक्षा होत्या आणि या चित्रपटाने त्या…

