Category: मासिकासाठी लेखन
-
भारssत माssझा देssश आहे ….
माझ्या शाळेतल्या मित्रमैत्रीणींनो, रोजच्या रोज न चुकता आपण कित्येक प्रतिज्ञा करत असतो…त्यापैकीच एक भारssत माssझा देssश आहे ……अगदी सकाळी उठायला उशीर झाला की …बास! मी उद्यापासून लवकर उठणार यार! किंवा शाळेत निघताना सायकलवर धुळीचा थर जमलेला दिसला की.. उद्याच्या उद्या सायकल स्वच्छ करणारे इथपासून ते ‘भारत माझा देश आहे. सारे…
-
ग्यानबा तुकाराम ढॅण्टढॅण टॅण्टढॅण
ग्यानबा तुकाराम ढॅण्टढॅण टॅण्टढॅण – एलिझाबेथ एकादशीच्या निमित्ताने ‘खेळ मांडियेला येत्या बालदिनी’ म्हणत परेश मोकाशी यांनी त्यांचा ‘एलिझाबेथ एकादशी’ हा चित्रपट यंदाच्या बालदिनाच्या दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित केला आणि त्या चित्रपटाने खराखुरा बालदिन साजरा केला. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ सारखा एक उत्कृष्ट चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शकाकडून तशाच किंबहुना अधिकच अपेक्षा होत्या आणि या चित्रपटाने त्या…
-
मोदी तरी बिचारे काय काय करणार?
नमो नमो नमो …… आमच्या देशातला पेट्रोलचा भाव कमी करा, आमच्या देशातला भष्टाचार कमी करा, रस्त्यावरचे खड्डे घालवा, प्रदूषण कमी करण्यासाठी;पर्यावरण संतुलित करण्यासाठी योजना आखा, आम्हाला नोकरी द्या, आम्हाला शिक्षणात राखीव जागा द्या आणि आणखीही बरंच …सर्व काही तुम्हीच करा ….. आमच्या ऐवजी शिक्षण तुम्हीच घ्या आणि पास पण तुम्हीच…
-
मार्ग’दर्शन’
पावसाची सर नुकतीच येऊन गेली, वाऱ्याचा उनाडपणा चालूच होता. कितीदातरी वाद झाला, तरी त्याचं आणि शेताचं एकमेकांशिवाय पानही हलत नाही हे अगदी खरं. त्यामुळे त्यांच्या दंग्याची मजा मीही मनापासून लुटत होते. त्यांची ‘झुळूक’ आणि ‘सुळूक’ ची भाषा आता मलाही काही नवी नाही, त्यामेले त्यांच्यातलीच एक बनत थांबत थबकत मधेच वळत…
-
प्रिय कुसुमाग्रज
!!श्री!! प्रिय कुसुमाग्रज, सादर नमस्कार पत्र लिहिण्यास कारण… खरं तर काहीच नाही…आणि म्ह्टलं तर खूप काही. तसा तुमच्याशी संवाद साधण्याची ही पहिलीच वेळ पण तुमचे ‘पाठीवरती हात ठेउन नुसते लढ म्हणा’ हे शब्द आमच्यासोबत आहेत ते अगदी बाकावर बसून पाठ्यपुस्तकातील कविता पाठ होईपर्यंत वाचली तेव्हापासून. तुमच्या कविता…
-
माउली नाम
कष्ट साहिले, स्वप्नं पहिले सोनसकाळी घरटे सजले… गोकुळ भरले, शिवार नटले आकाक्षांना धुमार फुटले… आले वारे, गेले वारे समृद्धीचे घन ओसरले… मास ही सरले, अंकुर नुरले ऋणाऋणाचे डोंगर झाले… कंठ दाटले, झुकल्या माना उमजे भुईचा निर्भय बाणा… थकले नांगर, थिजले स्पंदन आत्मघातकी विचारमंथन… तत्क्षणी स्मरले माउली नाम विरली छाया प्रकाश…
-
वेड मला
वेड मला जाईच्या नाजुकश्या गजऱ्याचे, वेड मला संध्येच्या साजुकश्या नटण्याचे, वेड मला गगनातील लुकलुकत्या ताऱ्यांचे, वेड मला धरणीवर भिरभिरत्या वाऱ्याचे, वेड मला रंगाचे, रंगातील संगाचे, संगातील भंगाचे वेड मला …१ वेड मला रुणझुणत्या कंकणनिनादांचे, वेड मला मिणमिणत्या दिपज्योतिकांचे, वेड मला झुळझुळत्या जललहरीचे, वेड मला सळसळत्या वेलपल्लविंचे, वेड मला गाण्याचे, गाण्यातील…