Category: मासिकासाठी लेखन
-
आद्य दुर्बीण
पहिल्या आकाशगंगेची निर्मिती कशी बरं झाली? ग्रह, लघुग्रह, उल्का, अशनी यांची निर्मिती कशामुळे होते? दूरचे तारे बघता येतील का? या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं विज्ञानाकडे असतात का? मोठमोठ्ठे प्रश्न… उत्तरं नसणारे! मग अशा वेळी काय करायचं? खगोलशास्त्रज्ञ म्हणतात, घाबरायचं नाही, उत्तरं शोधत राहायचं! पण मग या अक्राळविक्राळ अंतराळाचा अभ्यास…
-
ट्विटर: समाजाचे की मस्कचे माध्यम?
आपल्यापैकी काहींचा जन्म झाला तेव्हा इंटरनेटचा उदयही झालेला नव्हता. त्वरीत प्रतिक्रिया, मेसेज, पिंग असल्या गोष्टींचा थांगपत्ता नव्हता. स्पॅम मेल्स, स्युडो कोड्स, बॉट्स अशा गोष्टी खिजगणतीतही नव्हत्या. पण आपल्यापैकी काहींचा जन्म झाला तोच मुळी फेसबुकचा प्रोफाईल अपडेट करत. काहींनी अभ्यास केला तो व्हॉटस ऍप वापरत, काहींनी व्यवसाय मोठा केला तो…
-
पु. लं एक आनंदयात्री
दिवाळी अंकासाठी पु.लंवर लेख लिहायला जमेल का? विचारणाऱ्याचा प्रश्न ही बिलंदर होता. लिहिणार का पेक्षा जमेल का लिहायला हा खरा प्रश्न. वास्तविक पुलंचं लेखन मला खूप आवडतं असं म्हणणं आणि त्यांच्यावर एक लेख लिहिणं या दोन वाक्यातली तफावत गेल्या दहा दिवसात मला चांगलीच जाणवली. पण अखेर अवसान गोळा करून लिहिण्यास…
-
सातत्याने बदलणारं इलेक्ट्रोनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन तंत्रज्ञान
इलेक्ट्रोनिक्स चं क्षेत्र हे खरं तर रोजच्या बदलांचं किंबहुना सातत्यानं बदलत प्रगत होत माणसासमोर आव्हान निर्माण करणारं. स्वत:च तयार केलेल्या एका वस्तूला आणखी प्रगत आणखी सोईस्कर, आणखी आरामदायी कसं बनवता येईल, यासाठी आज कितीक नैसर्गिक मेंदू प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. हे तंत्रज्ञान अतिशय सहजी आपल्या आयुष्याचा भाग बनून जातं. याचं…
-
तंत्रज्ञान: बदलत्या निर्मिती प्रक्रीयेचं
सेक्शन फाईव्ह, मोअर स्पीड, फोर सेव्हन … अशी भरभक्कम आवाजात दिलेली आज्ञा, मोठमोठाली यंत्रे, त्यांचे मोठमोठाले गियर्स, ते गिअर एकमेकांत गुंफले जात असताना होणारा घणाघाती आवाज, आणि त्या यंत्रांसारख्या यांत्रिक हालचाली करणारे अनेक कामगार हे चित्र आहे चार्ली चॅप्लीन यांच्या मॉडर्न टाईम्स या अमेरिकन विनोदी चित्रपटातलं. त्या काळी जनजीवनावर आणि…
-
तंत्रज्ञान: कालच्या कल्पना आणि आजच्या वास्तवाला जोडणारा दुवा
उन्हानं करपून टाकलेल्या जमिनीवर वळवाचे थेंब पडू लागतात आणि तीच जमीन कात टाकावी तशी नवी कोरी दिसू लागते. मातीचा सुगंध दरवळतो, हवेतला ओलावा पानापानातून दाटून येतो. त्या पावसानं सारं वातावरण बदलून जातं, निसर्गाच्या मनात अचानक नवनवीन कल्पनांना धुमारे फुटू लागतात. ढगांची गडबड उडून जाते, काळे-पांढरे ढग गरजू लागतात, विजा कडाडू…
-
मला भावलेले विंदा …
यंदाचं हे गोविंद विनायक उर्फ विंदा करंदीकर यांचं जन्मशताब्दी वर्ष. त्या निमित्ताने अवघा महाराष्ट्र या तत्व चिंतकाच्या साहित्याचं स्मरण, अभ्यास आणि आनंद घेऊ बघतोय. एखाद्याच्या साहित्यात विविधता असावी ती किती सर्वव्यापी, सर्वस्पर्शी… याचं विंदा हे एक समर्पक उदाहरण. ते पिशीमावशी आणि तिची भुतावळ या त्यांच्या बालकवितेतून, कुठेतरी आहे-नाही च्या बेचकीत…
-
(इनोव्हेशन) नाविन्य भाग ६
इनोव्हेशन… इंटरनेट ऑफ थिंग्स (IOT/ आय ओ टी)च्या दिशेने Image credit: https://tridenstechnology.com/all-about-the-internet-of-things-iot/ विज्ञान आणि तंत्रज्ञानच्या प्रगतीचा वेग आज इतका जास्त आहे की आपण कुठून कुठे पोहोचलोय याचा रस्ताच आपल्याला सापडायचा नाही. तंत्रज्ञान, संगणक, इलेक्ट्रोनिक्स हे सध्याचे परवलीचे शब्द. तंत्रज्ञानामुळे इतक्या गोष्टी स्वयंचलित झाल्या आहेत की त्यावर आपला विश्वासही बसत नाही.…
-
(इनोव्हेशन) नाविन्य भाग ५
इनोव्हेशनची संजीवनी इनोव्हेशन ही काळाची गरज आहे त्यामुळे माणसाला सोई-सुविधा, आराम मिळतो हे सगळं तर झालंच. पण त्याचा खराखुरा जीवनदायी अनुभव जर कशातून लाभत असेल तर तो लाभतो वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे. हजारो वर्षापूर्वी चरक सुश्रुताच्या काळात कशा करत असतील शल्य चिकित्सा, शस्त्रक्रिया? झाडं, पानं, फुलं यांचे रस त्याच्या मात्रा वापरत असतील…
-
रंगेबेरंगी पशुपक्षी
अगदी लहानपणापासून आपण जसजसं झाडं, पानं, फळ-फुलं, निरनिराळे प्राणी आणि पक्ष्यांची ओळख करून घेत असतो तसतशी आपली निसर्गाशी ओळख होऊ लागते. निसर्गाचा अभ्यास हा विज्ञानाइतकाच किंबहुना त्याहूनही गहन असतो. आपल्याला साध्याशा वाटणाऱ्या गोष्टीच्या मागे खूप मोठा अर्थ सामावलेला असतो. उदाहरण घ्यायचं झालं तर असं पाहा; निसर्गात विविधरंगी पशुपक्षी दिसून येतात. काही…