Category: कविता
-
इकडून पाणी …तिकडून पाणी….
जगात पाणी, ढगात पाणी, वाफेमध्ये पाणीच पाणी जंगलात पाणी, डोंगरात पाणी, समुद्रामध्ये पाणीच पाणी इकडून पाणी, तिकडून पाणी, सगळीकडे पाणीच पाणी भूगोलात पाणी, शास्त्रात पाणी, पाण्यावरती कितीक गाणी गणितात पाणी, मराठीत पाणी, हिस्ट्रीमध्ये आणीबाणी इकडून पाणी, तिकडून पाणी, सगळीकडे पाणीच पाणी …
-
ढुंढता रहा दिल ढुंढता रहा
ढुंढता रहा दिल ढुंढता रहा… सुनी शामों में, सुनी राहों में, सुना घर कोई गिरता नजर आया ! ढुंढता रहा दिल ढुंढता रहा… खोए रिश्तो से, सोए सपनों से बदली नजरोंसे डरता नजर आया ! ढुंढता रहा दिल ढुंढता रहा… टुटे वादों में, टूटी कसमों में उजला फूल उसे हसता नजर आया !
-
क्षणा आजच्या तू
कर्तव्य मानून कर्मे क्रमिली फळे नित्य वैताग साऱ्या प्रसंगी जीवा दु:ख मानू नको त्या कृतींचे दुःखे तुझी ती नशिबाच्या नशिबी कधी काय कोठे नि कैसे करिशी उद्याचे भय नेई निद्रा लयासी जीवा सत्वरी सोड चिंता उद्याची कधी काळ दोन्ही न् जातील संगती मनस्वीच बुद्धी मनस्वीच वाचा जये कल्पिती सार अविचार…
-
कोरा रंग
मनाची समजूत काढलेली आहे कायमचीच; शिकवूनच ठेवलंय त्याला, बिनधास्त विश्वास ठेव आनंदावर आणि घे जोरात टाळी. काळजीच नको, याच जन्मात सुटणार आहेत चिंतांची जाळी. हं , उगीच भीतीच काहूर-बिहूर म्हणून सहानुभूती मिळव. पण किंचित समाधान सोबत घेऊन सुखाच्या कल्पनाही रंगव. अगदी रडावंसंच वाटलं तरी लाज वाटण्यासारखं काही नाही. उगीच कोणी…
-
माझिया बगिचात ….
माझिया बगिचात, होई रंगांची बरसात स्वप्न बाबांचे सत्यात, उतरले …१ माझिया बगिचात, डुले जास्वंदी गुलाब लाडकोड आई त्यांचे, पुरविते …२ माझिया बगिचात, रातराणी सुगंधली दिनरात मोहरली, प्रेमभावे …३ माझिया बगिचात, सदा पडे तगरीचा लाजे चांदणे तयाने, आभाळात …४ माझिया बगिचात, येती कमळाच्या ज्योती ज्ञान-कलेची समृद्धी, त्यांच्यासवे …५ माझिया बगिचात, हळदी-कुंकू…
-
कळूनही केला गुन्हा
शब्द होते सांधलेले, गीत होते बांधलेले अंतरीच्या काळजाचा वेध होता घेतलेला खेळ होता जीवघेणा, कळूनही केला गुन्हा । । १ । । सूर होते छेडलेले, तान होती घेतलेली स्वरलयींच्या कंपनाचा, मेळ होता घातलेला स्वप्न ते स्मरल्याविना, कळूनही केला गुन्हा । । २ । । डाव होता मांडलेला, जीत होती खेचलेली…
-
स्मृति
जगण्याला सुरुवात कुठे केली, विरहाची ही वेळ जवळी आली. श्वास अडला, भेट त्वरे सरली, परदेशास गाड़ी निघोनी गेली. झोप उडली, ड़ोळ्याशी नाही डोळा, तव स्मृति ही अश्रूत व्यूक्त झाली. हास्य ओठावर खोटे जरिही आणले, वेदनेला हृदयात दडविलेले. दिवस आले आणि कितिक गेले, मन स्मरणात अजुनि झुरत आहे. किती ठरवूनही न…
-
कसा मी कळेना…
क्वचित कधीतरी एखादी ओळ मनात घर करून जाते … कसा मी कळेना या विंदा करंदीकर यांच्या कवितेतील असा मी तसा मी कसा मी कळेना, स्वतःच्या घरी दूरचा पाहुणा मी माणसाची स्वतःशी असणारी ओळख किती अनोळखी असते …विंदा खूप सुंदर वर्णन करतात, कधी एखादं कस्पट तर कधी अवघं आकाश कधी सत्य…
-
गिनीपिग
सगळं तसं नेहमीसारखंच चालू होतं, या खांबावरून त्या खांबावर उड्या मारणं, या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत पळणं. समोर येणारे वेगवेगळे पदार्थ खाणं, कोणीतरी कधीतरी काहीबाही चौकशी करायला यायचं… सहज गप्पा मारून जायचं. पण फारसा काही बदल झालेला जाणवला नाही. असोत कोणीही आपल्याला काय करायचंय येतील जातील… जाओत बापडे! आपण आपल्या नित्य…