Category: कविता
-
असते तरी….नसतेच
चेहऱ्याला नाव असते, पण नावात काहीच नसते गाण्यात सम असते, पण समेवर गाणेच नसते शास्त्राला नियम असतो, पण नियमाला शास्त्रच नसते पाणी हेच जीवन असते, पण पाण्याला चवच नसते विचारांना म्हणे गती असते, पण गतीला विचारच नसतो रंगाचे मूळ पांढऱ्यात असते, पण पांढरा मुळी रंगच नसतो दाहीदिशांना वाट…
-
प्रिये चहा
प्रिये चहा, रात्रीचा समय सरता दे तू बेड टी मला…. प्रिये चहा आल्याचा वास सुटत दालचिनी नाममात्र निद्रा मम दूर करत हाती हवे चहा पात्र…..प्रिये चहा बाल्कनीत खूर्ची उभी मोबाईल निवांत जगी रविवासर संपल्याची जाणीवही जावो लया….प्रिये चहा आळसात पसरुनिया गेला जो वेळ अहा स्थिती मम ही बदलाया उठलो की पुन्हा…
-
जsssरा काही झालं की…..
परवा काय झालं, फोनवर बोलता बोलता एकीनं मला विचारलं, जsssरा काही झालं.. की लिहायला हवं का? मी म्हटलं, हो, लिहायला हवं. पावसाची चाहूल लागली की पाउल खिडकीपाशी वळायला हवं. किती गप्प बसशील मना, बरसायचं कधी? हे आता तुला कळायला हवं. जुन्या कागदांची पोतडी दिसली की तासभर तिच्यापास बसायला हवं.…
-
स्वप्नरंजन
जुलै महिना आला की कायम असं होतं कळत नकळत मन जुन्या दिवसात जातं असं नसतं की हे फक्त मलाच वाटतं असं फेसबुकवर या दिवसात कुणी नं कुणी ‘बालरंजन’चा फोटो शेअर किंवा लाईक करत असतं जुने दिवस जुन्या आठवणी मग रांगेत ओळीनी उभ्या राहतात उंचीप्रमाणे उभं करताना तारांबळ आणि आनंद एकदम…
-
मी हजार शंकांनी
(कवी संदीप खरे यांच्या “मी हजार चिंतानी हो डोके खाजवतो” या कवितेचा विडंबन प्रयत्न)मी हजार शंकांनी हे डोळे फिरवितो तो टेबलवर बसतो रमतो वेळ घालवितो मी जुनाट काळापरी किरकिरा बंदी तो सताड उघडया खिडक्यांचा पाबंदी मी आवेशाने पीपीटी बनवित असतो तो सोडून पीपीटी अपडेट व्हायला बघतोमी यूट्यूबवरच्या जाहिरातीवर चिडतो तो त्याच…
-
कंटाळा म्हणजे आळस नाही!!
दिवसाला असं सकाळी सकाळी उठवायचं डोळे चोळून चोळून गदागदा हलवत जागं करायचं तोही मग ओढल्यासारखा रखडत रखडत उभा राहतो कशाचच काही वाटत नसल्यासारखा तेच तेच करत राहतो बरं वाईट राग लोभ आशा निराशा यांच्या पल्याडची शांतता त्याला ढकलून ढकलून संध्याकाळच्या स्वाधीन करायचं वाटच बघत तोही चक्क सज्ज होतो उत्साहानं संपायची…
-
काय नाते?
अर्थवाही जाणीवेची स्पर्शवेड्या भावनेशी भेट होते चिंब ओल्या पावसाचे मौनगर्भी आर्ततेशी काय नाते? या मनाचे त्या मनाशी काय नाते? कर्मयोगी मानवांचे भोगवादी दानवांशी युद्ध होते मृत्तिकेच्या देवतेचे भौतिकाच्या दैवताशी काय नाते? या सुरांचे त्यासुरांशी काय नाते? सुखवस्तू चरणांची भेदरल्या दु:खाला साथ होते …
-
चहा म्हणजे चहा म्हणजे चहा असतो…
(कवी मंगेश पाडगावकर यांच्या ” प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं” या कवितेचे विडंबन) चहा म्हणजे चहा म्हणजे चहा असतो.. कितीही कुठेही मिळाला तरी तो हवा असतो.. काय म्हणता? या ओळी खोट्या वाटतात? द्रव्याच्या दृष्टीने चिल्लर वाटतात? वाटल्या तर वाटू दे, आटल्या तर आटू दे! तरीसुद्धा, चहा म्हणजे चहा…
-
आमचा गण्या हुश्शार बाई
आमचा गण्या हुश्शार बाई …. मार्क तो मिळवितो …. अस्से मार्क सुरेख बाई …. डिग्र्या तो कमवितो …. अश्श्या डिग्र्या कम्माल बाई …. नोकऱ्या त्या दिलविती …. अश्श्या नोकऱ्या कडक बाई …. प्रतिष्ठा त्या दाखविती …. असली प्रतिष्ठा भन्नाट बाई …. परदेशी जी धाडिते …. अस्सा परदेश सुसज्ज बाई ….…