Category: कविता
-
असं नाही

मोठ्ठी सुट्टी आहे म्हणून मुलांना शिबिरात पाठवलंच पाहिजे असं नाही उठसूट सतत त्यांना काहीतरी शिकवलंच पाहिजे असं नाही मुलं काही करत नाहीत म्हणून काऊन्सिलिंगला नेलं पाहिजे असं नाही त्यांना कंटाळा आला तर काय… हे पालकांनी ठरवलं पाहिजे असं नाही पाचवीपासून बारावीचं गणित आलं नाही तर जग बुडणार नाही नाहीच आली…
-
आहे आणि नाही
आहे आणि नाही यांच्यामध्ये बरेच काही घडते झाडावरून गळलेले पिकले पान पण पुरते… ओळख कुठे व्हावी लागते मानापमानासाठी काना मात्रा वेलांटी ही आणू शकते आठी… चूक आणि बरोबर यांच्यात असते अंतर मोठे माझेच खरे म्हटले की फुटत राहतात फाटे… सूर नसतातच जुळायचे जरी प्रयत्न केला ढीग रूसवेफुगवे धरून बसतात मनाची…
-
काव्य वाचन…

१. गझल उपदेशाचा: विंदा करंदीकर २. झाले हवेचेच दही: बा.भ.बोरकर ३.काळी बाभूळ सांगते: यशवंत पारखी ४. थेंब धारेचा होऊन: इंदिरा संत ५. पत्र लिही पण: इंदिरा संत ६. स्वार: कुसुमाग्रज ७. ते एक झाड आहे: शांता शेळके ८. संजीवनी बोकील ९. चुकले का हो: इलाही जमादार १०. सफरचंदाचे ना फक्त…
-
विंदांच्या कवितांचे वाचन
गेल्या महिन्यात आम्ही कॉलेजमध्ये असताना सादर केलेला विंदांच्या कवितांचा कार्यक्रम पुन्हा एकदा केला…आता कविता थोड्या वेगळ्या पद्धतीने भेटल्या आणि बरोबर आमची बच्चेकंपनी… एक वेगळा अनुभव या काव्यवाचनाचे व्हिडिओ शेअर करतेय, Part 1. लहान मुलांनी सादर केलेल्या कविता:- https://youtu.be/Wp-vdLqJaxo Part 2. https://youtu.be/34XIGdHU3EE Listen to Vindanchi Kavita – Shevatcha ladu.m4a by नंदिता…
-
माझे मत ही अगदी तसेच आहे…
गोंगाट आहे म्हणता, मला तरी तसे अजिबात वाटत नाही रोजच्या रोज रस्त्यावरुन मी ही गाडी चालवते… म्हणजे माझी तशी इच्छा असते. मग सिग्नल लागतो, मी थांबते… काही जण हॉर्न वाजवतात, मी सिग्नल कडे बघते. मग ते पुन्हा हॉर्न वाजवतात, मी बाजूला होऊन त्यांना जागा करून देते… म्हणजे हे एक असं…
-
कुणी…
लेकाच्या शाळेत कविता वाचन स्पर्धेसाठी कवितांचा शोध घेता घेता ही इंग्रजी कविता मिळाली, आवडली, डोक्यात रेंगाळत होती… त्या कवितेचा भावानुवाद करण्याचा हा मी केलेला पहिला प्रयत्न… मूळ कविता: Some One (1913) Walter de la Mare Someone came knocking At my wee, small door; Someone came knocking, I’m sure — sure…
-
पुन्हा एकदा
पुन्हा एकदा जुनं पुस्तक वाचायला हवं तेच तेच वाचताना, नवं काही उमगायला हवं पुन्हा एकदा जुना डोंगर चढून यायला हवं दगड-मातीशी आपलं नातं, कुरवाळायला हवं पुन्हा एकदा लहान भावंडांना चिडवायला हवं कुठकुठचे वाद, भांडणं उकरुन रडायला हवं पुन्हा एकदा जुन्या दोस्तांना भेटायला हवं वायफळ बडबडीत वेळेला दवडू द्यायला हवं पुन्हा…
-
देवा मायबापा,
देवा मायबापा, पडो दे प्रकाश दडपली जाओ, पॅंडोराची कुपी! पाहून जाहले, भव्य दिव्य सारे सामान्य राहू दे, जगणे आमुचे! पुरता कळला, तुझा कारभार आता खरोखरी, जाग आहे आम्हा! तुझ्या त्या घड्याळी, न क्षणाचा फरक अमुचेया हाती, नुरला वासर! भाग्याचा खेळ हा, पुरे झाला बाबा सुरळीत होवो, सारे चराचर! तूच तूच…
-
Whileone…
बघता बघता Whileone एक वर्षाचं झालं Infinite स्वप्नामधलं finite loop पूर्ण झालं मनापासून pass केल्यात load आणि stress tests Response time आता आमचा आहे सगळ्यात best आजवरच्या experience चा data base पक्का साथ देतोय आमच्या engineering performance चा benchmark ही set होतोय बायको म्हणते नोकरी सोडताना “विचार कर एकदा”…
-
डास मर्दन
फार पूर्वीच्या काळी म्हणे गॉड ऑफ क्रीएशन ची मुलगी इव्ह आणि गॉड ऑफ डिस्ट्रक्शनचा मुलगा ऍडम यांच सगळं काही चांगलं चाललं होतं … म्हणजे साधरणतः गोष्टीच्या शेवटी “अँड दे लीव्ह्ड हॅपिली एव्हर आफ्टर’’ कि काय तसलं .. हो पण सुरुवातीपासूनच… मग झालं इव्ह गेली माहेरपणाला वडिलांकडे, चार दिवस राहिली आणि…