Category: कविता
-
Pink it is…
गोड गुलाबी ल्याली झालर झुळूक रेशमी घाली पाखर स्पर्श कराया गेले सत्वर… गमले मजला प्रतिमा ही तर
-
The peacock …
सौंदर्याची खाण म्हणू की शृंगाराचा साज म्हणू? थेंब टपोरा सांगून गेला, हे भूवरचे इंद्रधनु!!
-
The sun
तू विचार तू विवेक तुझी कथा तूच नायक तू आदि नि तूच अंत तू पिंड नि ब्रह्मांड तूच
-
The moon
हवा नाही माती नाही खड्डेच आहेत म्हणे उसना घेऊन प्रकाश तो विकतो चांदणे… तंत्रज्ञान घेऊन माणूस कुठच्या कुठे पोचतोय जीपीएस विना हा मात्र स्वत: भोवतीच फिरतोय…
-
Green hope
भला मोठा वृक्ष त्याचा भलाथोरला केशसंभार नाजूकशा वेली त्यावर झुलती स्वप्न हिरवीगार
-
The king
विरोधकांनी चिखलफेक केलीच, तर शहाण्याने दुर्लक्ष करावे भक्तगणांनी डोक्यावर घेतलेच, तर शिताभूताचे कोष्टक मांडावे मित्रांचे मुखवटे उतरलेच जर, तर नेत्याने स्थितप्रज्ञ राहावे… राजाने नां आपले ध्येय्य ठरल्याप्रमाणे आपले सिंहासन सोडावे
-
The tree
वर्गाबाहेर काढलं होतं, अगदी तस्सं वाटतंय… त्याला एकटं पाहून, मलाच वाईट वाटतंय…
-
जास्वंदी
परा पश्यन्ति मध्यमा वैखरी अकार उकार मकार साकारी कितीक माणके सृष्टीच्या उदरी सगुण स्वरुप ओंकार त्यावरी
-
पारिजातक
भक्तीत रमले सोडुनिया बंध इवल्या कुपीत दाटलेला गंध… खुणावे धरती फिकटला रंग सानुले गुपित विठोबाचा संग…
-
व्होटिंग डे

आला रे आला व्होटिंग डे आला चला चला चला आता व्होटिंगला चला रस्त्याला खड्डं नि वाहनाचं थवं बिगी बिगी दादा थितं पोचायचं कसं नावाची चिट्टी हाये भलत्याच गावची उभा हाई कोन तेचा पत्ताच न्हाईकी इंजिनवाल्यानं परवा परचाराची म्होट्टी सभा घ्येतली जेवनाबरुबर उत्सवाच्या मांडवाची आशास्नं बी दिली बोलत सुटल्यात उरफाटी, मातीत…