Author: Nandita Gadgil
-
एक वही मैत्रीसाठी
एकदा म्हटलं, मैत्रीसाठी वही पहावी करून. मैत्री आणि मुक्तछंद, यांचं नातं जवळचं त्यामुळे रकाने सहजच ठरले. मैत्रीला बंधनांच वावडं, त्यामुळे कायदे आणि नियमांना नव्हता थारा. स्मरणातील पाने भराभर उलटली; शाळेतल्या बाकापासून कॉलेजच्या कट्ट्यापर्यंत, रानातल्या भटकंतीपासून समुद्राच्या लाटेपर्यंत, पुस्तकातील पानापासून टीव्हीवरच्या कार्टूनपर्यंत, वेलीवरच्या फुलापासून पावसाच्या सरीपर्यंत, आगगाडीच्या प्रवासापासून कंपनीतील क्युबिकलपर्यंत, कंपासपेटीतल्या…
-
एवढं मात्र मी बघून ठेवलंय
लोकांच्या बाबतीत रस्ता असतो सरळसोट, ठराविक, शिस्तशीर आमच्याच रस्त्यात मेले खाचखळगे, आड-विहिरी, आणि आडवे-तिडवे खांब. लोकांना नसतात प्रश्न, नुसती उत्तरच उत्तरं. आमच्या मनात मात्र कुठलाच प्रश्न कसा नाही हाही एक प्रश्न. लोकांची गणित एकदम सोप्पी आणि सुटणारी, बेरीज-वजाबाकीची. आमच्या गणितात मात्र कोडीच न उलगडणारी, एकशे सत्तावन्न टक्क्यांची. एवढं खरंच मी…
-
वेड मला
वेड मला जाईच्या नाजुकश्या गजऱ्याचे, वेड मला संध्येच्या साजुकश्या नटण्याचे, वेड मला गगनातील लुकलुकत्या ताऱ्यांचे, वेड मला धरणीवर भिरभिरत्या वाऱ्याचे, वेड मला रंगाचे, रंगातील संगाचे, संगातील भंगाचे वेड मला …१ वेड मला रुणझुणत्या कंकणनिनादांचे, वेड मला मिणमिणत्या दिपज्योतिकांचे, वेड मला झुळझुळत्या जललहरीचे, वेड मला सळसळत्या वेलपल्लविंचे, वेड मला गाण्याचे, गाण्यातील…
-
तो एक अनामिक ध्यास असे
तो एक अनामिक ध्यास असे त्या ध्यासाचा हर श्वास असे श्वास असे आभास असे परी एक आगंतुक आस असे! तो एक अनामिक ध्यास असे त्या ध्यासाची मज कास असे कास असे मनी वास असे परी एक निरंतर भास असे! तो एक अनामिक ध्यास असे त्या ध्यासाचा हव्यास असे हव्यास असे…
-
भरलंय आभाळ भिजून घे थोडं !
भरलंय आभाळ, भिजून घे थोडं! सुटलंय वारं, शहारून घे थोडं! सुचलंय गाणं, गाउन घे थोडं! साचलंय बरंच, बोलून घे थोडं! उरलोय मीच, लाजून घे थोडं!
-
जे व्हायचे ते होईल
समृद्धी नि श्रेयासाठी, मनुष्याची जीवनरहाटी या त्याच्याच कर्मांनी, जे व्हायचे ते होईल ज्याचा जन्म त्यासी ठाव, त्याचे त्या करायचे भाव म्हणोन सत्कर्मानी, जे ते उत्तम घडेल जे जे काही तो करील, ते ते नवीन ठरेल त्यांच्या उत्कर्षानी, सोनपाऊल पडेल हीच त्याच्या उत्तमतेची कास, हा का मना होई भास त्याच्या दुष्कर्मानी…