Author: Nandita Gadgil
-
लहान मुलांसाठी Golden books
लहान मुलांना खूप चित्र असणारी पुस्तकं बघायला जशी आवडतात तशीच थोडी थोडी अक्षरओळख झाल्यावर त्यात लिहीलेलं वाचावं असंही वाटायला लागतं. मी पण असंच छानसं पुस्तक शोधताना एक पुस्तक हातात आलं ‘Little golden books’. ही लहान मुलांसाठीच्या पुस्तकांची एक मालिका आहे. ही पुस्तकं पार १९४२ पासून आजवर वाचली जात आहेत. त्यापैकी ३…
-
आज्जीबाईच विनर
काही काळ काही आवाज आपल्याला कसे लख्ख आठवतात ना अगदी कितीही वेळ उलटून गेला तरी. ते दिवस आपण मनात पुन्हा जगू शकतो आणि काही आवाज आपल्या कानात ऐकूही शकतो. त्यात कधी एखादा कम्माल अनुभव असतो तर कधी एखादी दुखरी आठवण. एखाद्या विक्षिप्त माणसाला भेटल्याचा प्रसंग असतो तर कधी…
-
कठीण समय येता
एक भव्य सभागृह. त्यात कित्येक आसनं. त्यावर स्थानापन्न झालेले अनेक दिग्गज भारतीय नेते. समोरच्या बाजूला उच्चासन ज्यावर संसदेत स्पीकर बसतात ते. या उच्चासनावर एक दूरदर्शक आहे. टीव्ही म्हणूया आपल्या कल्पनेसाठी. कारण हे सभागृह आहे स्वर्गातलं. समोर सर्व भारतीय नेतेमंडळी बसलेली. स्वतःसाठी नाही तर देशाच्या भल्यासाठी झटलेली. देशाच हिताहित काय झालं…
-
वाचून तर बघूया !
जे ऐकायला मिळू नये असं सध्या बातम्यातून सगळं ऐकायला आणि बघायला मिळतंय. स्वदेश, स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषा याविषयीचा असणारा सार्थ अभिमान चालू घडामोडी बघून अस्वस्थ करून सोडतो. त्यातूनच विवेकानंद, रामकृष्ण यांची आठवण होते. त्यानिमित्तानं शिवाजीराव भोसले यांनी विवेकानंद या विषयावर दिलेलं व्याख्यान ऐकलं. समाधान होईना म्हणून सर्च चालूच ठेवला. तर…
-
कंटाळा म्हणजे आळस नाही!!
दिवसाला असं सकाळी सकाळी उठवायचं डोळे चोळून चोळून गदागदा हलवत जागं करायचं तोही मग ओढल्यासारखा रखडत रखडत उभा राहतो कशाचच काही वाटत नसल्यासारखा तेच तेच करत राहतो बरं वाईट राग लोभ आशा निराशा यांच्या पल्याडची शांतता त्याला ढकलून ढकलून संध्याकाळच्या स्वाधीन करायचं वाटच बघत तोही चक्क सज्ज होतो उत्साहानं संपायची…
-
काय नाते?
अर्थवाही जाणीवेची स्पर्शवेड्या भावनेशी भेट होते चिंब ओल्या पावसाचे मौनगर्भी आर्ततेशी काय नाते? या मनाचे त्या मनाशी काय नाते? कर्मयोगी मानवांचे भोगवादी दानवांशी युद्ध होते मृत्तिकेच्या देवतेचे भौतिकाच्या दैवताशी काय नाते? या सुरांचे त्यासुरांशी काय नाते? सुखवस्तू चरणांची भेदरल्या दु:खाला साथ होते …
-
भटो भटो…कुठे गेला होतात?
परवा मोबाईल स्क्रीनवरून भटकत भटकत मी एका फोरमवर पोहोचले. त्यात चर्चा चालू होती लहान मुलांच्या गाण्यांबद्दल. या फोरमवर बऱ्याचशा मराठी मुली ज्या परदेशी राहतात व ज्यांची मुले लहान आहेत अशा मिळून साऱ्याजणी जुनी गाणी शेअर करीत होत्या. कोणी अटक मटक चवळी चटक, कोणी अबडक खबडक घोडोबा, इथे इथे बस रे…
-
Manthan science fair
It feels so good to share about one of the venture taken up by Manthan Educational Initiative since Science day 2015. Manthan Science fair brings about a valuable experience which many of the students miss in their regular school routines. They try to read, write and try to learn science…
-
विज्ञानाची शिडी
“चला, संपली परीक्षा! विज्ञानाचे पेपर इतक्या उशिरा का ठेवतात यार? अख्खी परीक्षा होईपर्यंत टेन्शन नुसतं.” असं म्हणत म्हणत सुहास आणि तुषार परीक्षा वर्गातून बाहेर आले. तुषार वर्गातला हुशार विद्यार्थी, वर्गात कायम पहिला येणारा. त्याच्या या गुणामुळे इतर मुलांमध्ये तो जरा नावडता. परिणामी त्याला सगळे ‘रट्टू’ म्हणून चिडवतसुद्धा. तर सुहास हुशार…