Author: Nandita Gadgil
-
नवल – प्रशांत बागड

कादंबरी/गोष्ट/रोजनिशी..काय म्हणू…..कथाभाग म्हणूया… खानदेश, महालगाव या लहानग्या गावातून सोनकुळे आडनावाच्या एका विद्यार्थ्याने शहरात प्रवेश मिळवलेली आहे. मेरीट वर त्याला ही ऍडमिशन मिळाली आहे. त्याचबरोबर त्याला हॉस्टेल मध्ये प्रवेश सुद्धा मिळालेला आहे. उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या आणि त्या बळावर प्रवेश मिळवलेला हा विद्यार्थी पहिल्यापासून आत्मविश्वास असणारा आहे. त्याला स्वतःची अशी मते…
-
असं नाही

मोठ्ठी सुट्टी आहे म्हणून मुलांना शिबिरात पाठवलंच पाहिजे असं नाही उठसूट सतत त्यांना काहीतरी शिकवलंच पाहिजे असं नाही मुलं काही करत नाहीत म्हणून काऊन्सिलिंगला नेलं पाहिजे असं नाही त्यांना कंटाळा आला तर काय… हे पालकांनी ठरवलं पाहिजे असं नाही पाचवीपासून बारावीचं गणित आलं नाही तर जग बुडणार नाही नाहीच आली…
-
एक होता कार्व्हर

लेखिका – वीणा गवाणकर ‘एक होता कार्व्हर’ हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ जॉर्ज वाशिंग्टन कार्व्हर यांचे चरित्र आहे. त्यांच्या जीवनाचा खडतर प्रवास अतिशय मार्मिकपणे रेखाटलेली १९८१ साली प्रथम प्रकाशित झालेली कादंबरी. अमेरिकेत, मिझुरी राज्यात, डायमंड ग्रोव्ह पाड्यावर मोझेस कार्व्हर या शेतकऱ्याकडे मेरी नावाच्या कृष्णवर्णीय स्त्रीने याला जन्म दिला. त्या काळात…
-
डॉ. आयडा स्कडर

वीणा गवाणकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेलं हे व्यक्तीचित्रण. आई-वडील मिशनरी म्हणून भारतात काम करत होते.. ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी दक्षिण भारतात काम. तिथल्या लोकांना वैद्यकीय सेवा पुरवणे आणि होता होईल तो धर्माचा प्रसार करणे हा त्यांचा हेतू. आयडाही अगदी लहान असताना त्यांच्याबरोबर भारतात होती. पण प्रचंड दुष्काळ पडला आणि या…
-
आहे आणि नाही
आहे आणि नाही यांच्यामध्ये बरेच काही घडते झाडावरून गळलेले पिकले पान पण पुरते… ओळख कुठे व्हावी लागते मानापमानासाठी काना मात्रा वेलांटी ही आणू शकते आठी… चूक आणि बरोबर यांच्यात असते अंतर मोठे माझेच खरे म्हटले की फुटत राहतात फाटे… सूर नसतातच जुळायचे जरी प्रयत्न केला ढीग रूसवेफुगवे धरून बसतात मनाची…
-
जॉनाथन स्ट्राऊड आणि ऍम्युलेट ऑफ समरकंड

जे.के. रोलिंग चं हॅरी पॉटर वाचून झाल्यावर जादुई जगतातील अजून काही वाचावं का नाही…हे नक्की कोडं आहे…पण तरीही… जॉनाथन स्ट्राऊड याचं ऍम्युलेट ऑफ समरकंड हातात आलं… आणि तेही तितकंच रंजक असल्याचं जाणवलं. या पुस्तकात जादुई जग हे सामान्य जगाचा एक भाग आहे इतकंच नव्हे तर ते कुठेतरी ब्रिटनचा कारभारही चालवत…
-
बोक्या सातबंडे

बोक्या .. नावातच काहीतरी उचापती किंवा मस्ती करणारा हा मुलगा असणार हे आलंच. दिलीप प्रभावळकर लेखणीतून अवतरलेल्या या पात्राबद्दल किती बोलावं तेवढं कमीच आहे. हे पात्र शेंडेफळ, दंगेखोर, जरा आगाऊच पण हुशार, धाडसी, लोकांना मदत करण्यासाठी धावून जाणारा आणि नितांत लाघवी, संवेदनशीलही आहे. मित्राने पाळलेल्या प्राण्यांची काळजी घेताना गोंधळ घालणारा…
-
काव्य वाचन…

१. गझल उपदेशाचा: विंदा करंदीकर २. झाले हवेचेच दही: बा.भ.बोरकर ३.काळी बाभूळ सांगते: यशवंत पारखी ४. थेंब धारेचा होऊन: इंदिरा संत ५. पत्र लिही पण: इंदिरा संत ६. स्वार: कुसुमाग्रज ७. ते एक झाड आहे: शांता शेळके ८. संजीवनी बोकील ९. चुकले का हो: इलाही जमादार १०. सफरचंदाचे ना फक्त…
-
शिरवाडकरांच्या विनोदी कथा

परवा कथेच्या पुस्तकाचा शोध घेत असताना हे पुस्तक दिसलं. वि. वा. शिरवाडकर यांच्या विनोदी कथा. कवी कुसुमाग्रज आणि नटसम्राटचे नाटककार शिरवाडकर या पुस्तकात भेटले ते भलतेच निवांत लेखक म्हणून. साधी सरळ भाषा तितकेच साधे सरळ विनोद. या पुस्तकात पंधरा वेगवेगळ्या कथा आहेत, विषयही वेगवेगळे. हो, अगदी साधे सोपे. मुळात उत्कृष्ट…
-
गूढ आणि गंभीर जी ए: पिंगळावेळ

कॉलेजमध्ये असताना जीएंचं लेखन आणि त्याबद्दलही खूप ऐकलं. ते मुद्दाम वाचायला मात्र घ्यावंसं वाटलं नाही कारण ते कायमच गूढ, अनाकलनीय वाटत राहिलं. सध्या त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने बरेच कथावाचनाचे कार्यक्रम होताहेत. तेव्हा घरात असूनसुद्धा न वाचलेलं पुस्तक जरा वाचून तरी बघूया म्हणून खरं तर वाचायला घेतलं. पिंगळावेळ: कथांचं पुस्तक…. दीर्घ कथांचं.…