अमुकतमुकची मैत्रिण: ए काय करणार आज?

अमुकतमुक: काय अगं व्हॅन वगैरे बंद नं..मग घरीच, म्युट अनम्युट करत काम चाललंय… तू काय करणारेस?

अमुकतमुकची मैत्रिण: गाजराचा हलवा, आणि मटर पनीर..तुझा तो सिक्रेट इंग्रेडियंट घालून…

अमुकतमुक: काय…?

अमुकतमुकची मैत्रिण: बडिशेप गं!

अमुकतमुक: हं … मला वाटलं… जायफळ 🙂

अमुकतमुकची मैत्रिण: आणि हवा बघ ना कशी ते… त्यामुळे गेलाबाजार घोटाळ्याची भजी पण करून टाकते… छान कोवळी मिळाली परवा

अमुकतमुकचा मुलगा: होतो हॅबिलीस होता सेकंड ह्युमन होता

अमुकतमुकची मैत्रिण: काय म्हणतोय गं?

अमुकतमुक : इतिहासाचा धडा वाचतोय…पण त्याला माहित नाहीये गं काळ… माझच इतकं कन्फ्यूजन आहे नं… वर्तमान म्हणजे चालू भूतकाळ, भूतकाळ म्हणजे चालू वर्तमानकाळ आणि

अमुकतमुकची मैत्रिण: अगं भविष्यकाळ…अमुकतमुक: म्हणजे तूच सांग… चार ऑप्शन्स.. १) अंधार २) अज्ञान ३) अविचार ४) वरीलपैकी सर्व…