परवा खूप दिवसांनी छान छान गोष्टी ऐकल्या. अशोक सराफ यांनी वाचलेली जग्गू आणि पावट्याचा वेल ..सगळ्यात आवडती गोष्ट. का कुणास ठाऊक? त्या गोष्टीतल्या जग्गूचा पावट्याचा वेल कसा काय वाढत जात असेल आणि मग तिकडे राक्षसाचं घर कसं असेल, राक्षसाच्या राजाची जादूची कोंबडी, देतेस का मला चार सोन्याची अंडी ? असं म्हटल्यावर ती अंडी देते .. राक्षस वेलीवरून खाली पडून मरून जातो, जग्गू घरी कोंबडी घेऊन येतो आणि श्रीमंत होतो. .सगळं किती स्वप्नवत आहे नं.. पण आवडतं तसंच. खूप आत्मविश्वास देणारं आणि कधी कोणी दुखा:त राहात नाही फार काळ, कोणीतरी मदत करणारं असतंच …असं काहीतरी मनात येत असे तेव्हापासून. तर ही झाली जग्गूची झाली आता गणूची गोष्ट.
गणूची चौथी गोष्ट: घर
एक दिवस गणूला बाहेरुन घरी यायला खूपच उशीर झाला. आईबाबांबरोबर बाहेर गेलं की असंच होतं. ते आरामात असतात. गणूला कधी एकदा घरी येतोय असं होऊन जातं. अवघड असं, की हे तो सांगूही शकत नाही. घरी आलं की त्याला एकदम छान वाटतं. मोकळं मोकळं. मग तो सगळ्या वस्तूंना हळूच हात लावून पण बघतो. सगळं जिथल्या तिथेच असतानाही त्याला तसं करावसं वाटतं. गणू उशीवर उडी मारून बघतो. पांघरूण गुंडाळून घेतो. खरंच घर किती हवंहवसं असतं. घर ना गोड गोळीसारख असतं. खायच्या आधी, खात असताना आणि खाऊन झाल्यावर पण हवंच असतं. गणू आईला समजावतो. गणू चंपटराव आहेस तू असं म्हणत आई न राहवून कडेवर घेते आणि घट्ट मिठी मारते. असं काहीतरी झालं की आई असंच वागते. मग गणूला काही कळत नाही. आई आपली डोळ्यातून हसत राहते आणि गणू नुसता वाचत बसतो तिचे डोळे.
ही गणूची गोष्ट …घराची… आपल्या सगळ्यांची अगदी सारखी असते नं, म्हणजे जगभर फिरून जरी लक्षावधी जागा बघितल्या, मनसोक्त उंडारलो तरी घर हे घर असतं.
एक कविता आठवतेय आवर्जून वाचावी अशी….कोणाची आहे माहित नाही… आजीनं आवडली म्हणून वाचून दाखवलेली आठवतेय. आजी ही कविता नवीन लग्न झालेल्या प्रत्येकाला आवर्जून वाचून दाखवत असे, आणि या कवितेची आडवली म्हणून नुसती फ्रेम करू नका तर त्यावर विचार पण करा असा दमही देत असे……
एक कविता आठवतेय आवर्जून वाचावी अशी….कोणाची आहे माहित नाही… आजीनं आवडली म्हणून वाचून दाखवलेली आठवतेय. आजी ही कविता नवीन लग्न झालेल्या प्रत्येकाला आवर्जून वाचून दाखवत असे, आणि या कवितेची आडवली म्हणून नुसती फ्रेम करू नका तर त्यावर विचार पण करा असा दमही देत असे……
घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती
तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती
त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी
सूर जुळावे परस्परांचे नकोत नुसती गाणी
त्या अर्थाला अर्थ असावा नकोत नुसती नाणी
अश्रुतूनही प्रीत झरावी नकोच नुसते पाणी
त्या घरट्यातून पिलू उडावे, दिव्य घेउनी शक्ती
आकांक्षांचे पंख असावे, उंबरठ्यावर भक्ती
सूर जुळावे परस्परांचे नकोत नुसती गाणी
त्या अर्थाला अर्थ असावा नकोत नुसती नाणी
अश्रुतूनही प्रीत झरावी नकोच नुसते पाणी
त्या घरट्यातून पिलू उडावे, दिव्य घेउनी शक्ती
आकांक्षांचे पंख असावे, उंबरठ्यावर भक्ती
गणूची पहिली गोष्ट: http://nanditagadgil.blogspot.in/2017/06/blog-post_28.html
गणूची दुसरी गोष्ट: http://nanditagadgil.blogspot.in/2017/09/blog-post.html
गणूची तिसरी गोष्ट: http://nanditagadgil.blogspot.in/2017/07/blog-post.html
