Category: Marathi Content
-
कसा मी कळेना…
क्वचित कधीतरी एखादी ओळ मनात घर करून जाते … कसा मी कळेना या विंदा करंदीकर यांच्या कवितेतील असा मी तसा मी कसा मी कळेना, स्वतःच्या घरी दूरचा पाहुणा मी माणसाची स्वतःशी असणारी ओळख किती अनोळखी असते …विंदा खूप सुंदर वर्णन करतात, कधी एखादं कस्पट तर कधी अवघं आकाश कधी सत्य…
-
गिनीपिग
सगळं तसं नेहमीसारखंच चालू होतं, या खांबावरून त्या खांबावर उड्या मारणं, या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत पळणं. समोर येणारे वेगवेगळे पदार्थ खाणं, कोणीतरी कधीतरी काहीबाही चौकशी करायला यायचं… सहज गप्पा मारून जायचं. पण फारसा काही बदल झालेला जाणवला नाही. असोत कोणीही आपल्याला काय करायचंय येतील जातील… जाओत बापडे! आपण आपल्या नित्य…
-
माउली नाम
कष्ट साहिले, स्वप्नं पहिले सोनसकाळी घरटे सजले… गोकुळ भरले, शिवार नटले आकाक्षांना धुमार फुटले… आले वारे, गेले वारे समृद्धीचे घन ओसरले… मास ही सरले, अंकुर नुरले ऋणाऋणाचे डोंगर झाले… कंठ दाटले, झुकल्या माना उमजे भुईचा निर्भय बाणा… थकले नांगर, थिजले स्पंदन आत्मघातकी विचारमंथन… तत्क्षणी स्मरले माउली नाम विरली छाया प्रकाश…
-
एक वही मैत्रीसाठी
एकदा म्हटलं, मैत्रीसाठी वही पहावी करून. मैत्री आणि मुक्तछंद, यांचं नातं जवळचं त्यामुळे रकाने सहजच ठरले. मैत्रीला बंधनांच वावडं, त्यामुळे कायदे आणि नियमांना नव्हता थारा. स्मरणातील पाने भराभर उलटली; शाळेतल्या बाकापासून कॉलेजच्या कट्ट्यापर्यंत, रानातल्या भटकंतीपासून समुद्राच्या लाटेपर्यंत, पुस्तकातील पानापासून टीव्हीवरच्या कार्टूनपर्यंत, वेलीवरच्या फुलापासून पावसाच्या सरीपर्यंत, आगगाडीच्या प्रवासापासून कंपनीतील क्युबिकलपर्यंत, कंपासपेटीतल्या…
-
एवढं मात्र मी बघून ठेवलंय
लोकांच्या बाबतीत रस्ता असतो सरळसोट, ठराविक, शिस्तशीर आमच्याच रस्त्यात मेले खाचखळगे, आड-विहिरी, आणि आडवे-तिडवे खांब. लोकांना नसतात प्रश्न, नुसती उत्तरच उत्तरं. आमच्या मनात मात्र कुठलाच प्रश्न कसा नाही हाही एक प्रश्न. लोकांची गणित एकदम सोप्पी आणि सुटणारी, बेरीज-वजाबाकीची. आमच्या गणितात मात्र कोडीच न उलगडणारी, एकशे सत्तावन्न टक्क्यांची. एवढं खरंच मी…
-
वेड मला
वेड मला जाईच्या नाजुकश्या गजऱ्याचे, वेड मला संध्येच्या साजुकश्या नटण्याचे, वेड मला गगनातील लुकलुकत्या ताऱ्यांचे, वेड मला धरणीवर भिरभिरत्या वाऱ्याचे, वेड मला रंगाचे, रंगातील संगाचे, संगातील भंगाचे वेड मला …१ वेड मला रुणझुणत्या कंकणनिनादांचे, वेड मला मिणमिणत्या दिपज्योतिकांचे, वेड मला झुळझुळत्या जललहरीचे, वेड मला सळसळत्या वेलपल्लविंचे, वेड मला गाण्याचे, गाण्यातील…