Category: ललित
-
आता बघच तू……
(रविवारचा दिवस, सिद्धार्थ आणि त्याचे आई-बाबा दिवाणखान्यात बसलेले आहेत. आई-बाबा एकीकडे चहाचा एक घोट घेत दुसरीकडे पेपरची पान चाळत आहेत. सिद्धार्थ टीव्ही बघत बसलेला आहे.) सिद्धार्थ: अहाहा …what a life!!! आई: का काय झालं विशेष? सिद्धार्थ: रात्री एक movie बघितलाय, सकाळी सकाळी टीव्ही लाऊन बसलोय ..आणि तरीही तू ..उठ..आवर…आंघोळ कर…
-
ढ क ल…………..
आईनी परवा नवा मोबाईल घेतला. मी सपासप तिला वेगवेगळे ऍप्स डाउनलोड करून दिले. आईला शिकवायची संधी कुठली सोडतेय मी….तर त्यात एक होतं whats app. तिला कमाल वाटली wifi काय… हे सुटसुटीतपणे करता आलेलं मेसेजिंग काय..कमालच सगळी…आई खुष. हळूहळू तिची एकेक करत whats app group मध्ये entry झाली..शाळेतले विद्यार्थी, मैत्रिणी, काहीतरी…
-
असो………!!!!!!!!!!!!!!!!!!
सर्वसामान्य माणसाच्या तोंडचा तद्दन गुळमुळीत उद्गार……!!!! सदैव मान खाली घालून पांढरं निशाण हातात घेतलेला पवित्रा….!!!!कितीही काहीही आणि कुठेही घोडचूक होताना दिसली तरी आपण सहज हा हतबल उद्गार काढून; चला इथून पुढच्या पानावर असं म्हणून मोकळे होतो. घटना कुठलीही असो, उद्गार remains constant. म्हणजे काल संध्याकाळी आणलेली कांद्याच्या पात खराब निघाली…
-
न सुटलेलं कोडं
(प्रचंड आवाजात, अचाट लोकांची गर्दी, खूप गोंधळ खरं तर कल्ला, लाउड स्पीकरचा आवाज…मुंगळा…गाणं चालू……एक रथ रस्त्यावरून निघालेला असतो …फ़क्त त्यातली गणपतीची मूर्ती गायब ….लोकांना मात्र त्याचा पत्ता नाही….. तेवढ्यात आवाज …….हॅलो …हॅलो …हंहंहं …..मोठ्यांदा बोला ….एकू येत नाहिये …कोणीतरी फोनवर बोलायचा प्रयत्न करतंय…चक्क गणपती धावत गर्दीच्या बाहेर …फोनवर बोलत येतोय….)…
-
मज लोभस हा इहलोक हवा
जगण्याची अतोनात इच्छा असावी तर बा भ बोरकरांसारखी, स्वर्ग न मागता ते इहलोक मागतात, इथला हर्ष न शोक त्यांना हवासा वाटतो. शंतनुचा मोह, ययातिचा देह न् पार्थाचा संदेह ते मागतात. इंद्राचा भोग आणि चंद्राचा ह्रुद्रोग हवा असतो, सुखाची अपेक्षा करत असताना दुःख दे आणि सोसायचे धैर्य दे म्हणून ते थांबत…