Category: ललित
-
सुट्ट्या
‘तुम्हाला केवढ्या सुट्ट्या असतात आमचं तसं नाही आम्हाला मोजून इतक्या इतक्या सुट्ट्या असतात. मजाय तुमची!!’ ‘काय नं सुट्ट्या मिळत नाहीत अग त्यामुळे माझं हल्ली इंडियाला जायचं ठरवताच येत नाहीये इत्यादी इत्यादी’ तर ‘सुट्ट्या’ या विषयावर परवा बोलत होतो तेव्हा आमचे एक मित्रश्रेष्ठ म्हणाले ‘वाढदिवसाला सुट्टी मिळायला काय बालवाडी आहे का?…
-
आशावायु….
तुम्ही फेसबुकवर आपल्या मित्रमैत्रिणींनी त्यांचं एक विचित्र स्टेट्स शेअर केलेलं वाचलं आहे का? त्यात लिहेलेलं असत की तुमचं मृत्यू कधी होणार आहे आणि कशा पद्धतीने. मी वाचलंय काहीजण म्हणे अपघाताने तर काही दुर्धर आजाराने मरण पावणार आहेत. मग काहीजण जे आत्ता ५० वर्षांचे आहेत ते अजून ८० वर्ष जगणार आहेत…
-
आज्जीबाईच विनर
काही काळ काही आवाज आपल्याला कसे लख्ख आठवतात ना अगदी कितीही वेळ उलटून गेला तरी. ते दिवस आपण मनात पुन्हा जगू शकतो आणि काही आवाज आपल्या कानात ऐकूही शकतो. त्यात कधी एखादा कम्माल अनुभव असतो तर कधी एखादी दुखरी आठवण. एखाद्या विक्षिप्त माणसाला भेटल्याचा प्रसंग असतो तर कधी…
-
कठीण समय येता
एक भव्य सभागृह. त्यात कित्येक आसनं. त्यावर स्थानापन्न झालेले अनेक दिग्गज भारतीय नेते. समोरच्या बाजूला उच्चासन ज्यावर संसदेत स्पीकर बसतात ते. या उच्चासनावर एक दूरदर्शक आहे. टीव्ही म्हणूया आपल्या कल्पनेसाठी. कारण हे सभागृह आहे स्वर्गातलं. समोर सर्व भारतीय नेतेमंडळी बसलेली. स्वतःसाठी नाही तर देशाच्या भल्यासाठी झटलेली. देशाच हिताहित काय झालं…
-
भटो भटो…कुठे गेला होतात?
परवा मोबाईल स्क्रीनवरून भटकत भटकत मी एका फोरमवर पोहोचले. त्यात चर्चा चालू होती लहान मुलांच्या गाण्यांबद्दल. या फोरमवर बऱ्याचशा मराठी मुली ज्या परदेशी राहतात व ज्यांची मुले लहान आहेत अशा मिळून साऱ्याजणी जुनी गाणी शेअर करीत होत्या. कोणी अटक मटक चवळी चटक, कोणी अबडक खबडक घोडोबा, इथे इथे बस रे…
-
बर्थडे पॅरॅडॉक्स
एक दिवस मी आणि राजीव गप्पा मारत असताना योगायोगाच्या काही गोष्टींची योगायोगाने चर्चा झाली. विषय होता; ‘बर्थडे’. हल्ली बर्थडेच्या दिवशी गुगल डूडल तुम्हाला हॅपी बर्थडे विश करते. ते बघून वेगाने प्रगत होत चाललेल्या technology बद्दल बोलत होतो. मग विषय तसाच पुढे गेला तो थेट number theory पर्यंत जाऊन पोहोचला. तेव्हा…
-
सगळं पाहिजे इम्पोर्टेड
वैदेही आणि अपूर्वा बऱ्याच दिवसांनी भेटल्या. वैदेहीचे कामानिमित्त सतत परदेश दौरे आणि अपूर्वाचा संसार एके संसार; त्यामुळे या जीवश्च कंठश्च मैत्रिणींना आज काल भेटायला वेळच होत नव्हता. खूप दिवसांनी परवा गाठ पडली आणि नेहमीच्या विषयावर गाडी आली. “काये नं, क्वालिटी नाही गं आपल्याकडे.” नेहमीप्रमाणे वैदेही रडली. त्या दिवशी का कुणास…
-
सायकल, मेणबत्ती आणि पाडगावकर
दोन पायांची चाकं जसजशी पटापट उचलता येतात तसतसं वेगाचं वेड लागतं. आपण पळायला सुरुवात करतो. आणखी वेग हवासा वाटतो, आणि सायकल नावाच्या वाहनाशी ओळख होते. सायकलवर टांग टाकून कमीत कमी वेळात एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्याचे वेध लागतात. आपला वेग जसा वाढतो तसा चेहऱ्याला हवेची निराळी मजा कळते.…