Category: ललित
-
बाबांची बदली … पाच पेडी
मला ना, बाबांच्या ऑफिसचा खूप म्हणजे खूप राग येतो. काही वेळा तर वाटतं, ऑफिस बंदच पडलं तर किती छान होईल. बरोबर खेळायला, फिरायला, गप्पा मारायला मारामारी करायला बाबा घरी. सारखं आपलं अरे बंडू, त्यांना त्रास देऊ नकोस, ऑफिसला निघालेत, त्याला कशाला हात लावलायस अरे, ते ऑफिसचे कागद आहेत. छे:! काही…
-
काय कधी कोणी कुठे ….. thats the way माही वे……
धोनी टेस्ट नंतर एकदिवसीय सामन्यांचं कप्तानपद सोडून देतोय……. ? पूर्वीचे captain चांगले होते, आताचा captain लईच भारी आहे वगैरे सगळं झालंच पण धोनी? धोनी धोनी आहे. कारण तो नुसता भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान नाहीये तर पूर्ण देशाला गर्व वाटावा असा एक कमालीचा नेता, व्यवस्थापक, दिग्दर्शक आहे. क्रिकेटच्या मैदानावर सलग चार…
-
कवितेच्या नादात….
कवितेचा जन्म व्हायला हातात पेन असावंच लागतं टेबलवर डायरी आणि कॉफीच्या मगाला स्थान लागतं ऋतूनीही बदलायचं असतं, कधी ऊन कधी पाउस हवा-पाणी बदलावं लागतं नुसती पुरत नाही हौस खूप काहीतरी घडावं लागतं अपघातानं वा आग्रहानं किंवा भांडणही पुरतं सुचतं बरंच मानापमानानं स्मृतींच्या आडवळणी रस्त्यात मग मनाला सोडायचं मार्ग दिसावा म्हणून…
-
भौमितिक दिवाळी
शाब्दिक दिवाळी, सांगीतिक दिवाळी, पौष्टिक दिवाळी तशीच एक भौमितिक दिवाळी. कंपास, कर्कटक, कोनमापक, सहा इंची पट्टी, टोक केलेली गुळगुळीत शिसाची पेन्सिल, खोडरबर, सोबत कागद म्हणजे दिवाळी. समांतर रेषा, त्रिकोण, चौकोन, पंचकोन, लंबदुभाजक, कोनदुभाजक, आंतरवर्तुळ यांनी सजलेलं टेबल म्हणजे दिवाळी. x आणि y यांच्याबरोबर z ऍक्सिसने दुपारभर सहजपणे ५,३,२, खेळायला येऊन…
-
#आज अचानक
गेल्या काही महिन्यांपूर्वी ‘अचानक’ या शब्दाचा अर्थ मला नव्याने नुसता कळला असं नाही तर अनुभवायलाही मिळाला. काय गंमत असते? आपण एखादी गोष्ट जेव्हा ठरवून करतो आणि ती जमते तेव्हा आनंद होतोच. पण जर अशी एखादी गोष्ट अनपेक्षित असताना करायला मिळाली आणि थोड्याफार प्रमाणात ती मनासारखी करता आली तर…
-
लाटाच लाटा
निळाशार समुद्र आणि त्याचं अथांग अस्तित्व. त्याची उसळलेली लाट जमिनीपर्यंत पोहोचावी न मग त्याच्या व्यक्तित्वाची जाणीव भुईला व्हावी. लाटेलाटेतून होत आसावा संवाद नभाचा नि भुईचा. या लाटांतून आकंठ जगावं या भूमीनं आणि उकलीत जावं कोडं या विश्वाचं. कधी उंच लाटा कधी मध्यम लाटा. कधी वेगवान लाटा कधी संथ लाटा. कधी…
-
आजीची पत्रं
लहानपणी आपण कसे गंमतीदार वागतो, कोणी गावाहून आलं की लगेच मला काय आणलंय? आई भाजी घेउन येतेय तर माझ्या आवडीची आणलीस का? असं आपलं टुमणं चालूच असतं. याच ‘मला काय आणलंय’ या भानगडीत एक दिवस भर पडली ती आजीच्या पत्राची. बाबा पोस्टाच्या पेटीतून कागदपत्र…
-
फोर व्हीलरशी ओळख..२
‘रस्त्यावर किती गर्दी असते, मुलाला मागे बसवलं नं की तो रडतो आणि म्हणतो, आईनी कार नाही चालवायची, हो; आणि पार्क करायला जागा कुठे असते आजकाल छे..’ असे अनेक विचार माझ्या कार-ड्रायव्हिंगच्या आड येत गेलेले आहेत. मीही अगदी इमानदारीत ते मान्य करून जमेल तितके वेळा कार ड्राईव्ह करणं टाळतही आलेय. नकोच…
-
फोर व्हीलरशी ओळख..१
फोर व्हीलर चालवता येणं, न येणं ही गोष्ट आपल्या आत्मविश्वासाची चांगलीच परीक्षा घेऊ शकते. लहानपणापासून सायकल, गियर्ड किंवा विदाउट गियर्ड व्हेहीकल चालवू शकू किंवा नाही हा प्रश्न कधीच पडला नाही. पण चारचाकीविषयी मात्र मला कायम संभ्रम होता. खरं पाहता चारचाकी घरी आली तेव्हाचा माझा उत्साह अवर्णनीय होता असं आठवतंय. स्वर्गाला…