Category: ललित
-
बंद म्हणजे…
अमुकतमुकची मैत्रिण: ए काय करणार आज? अमुकतमुक: काय अगं व्हॅन वगैरे बंद नं..मग घरीच, म्युट अनम्युट करत काम चाललंय… तू काय करणारेस? अमुकतमुकची मैत्रिण: गाजराचा हलवा, आणि मटर पनीर..तुझा तो सिक्रेट इंग्रेडियंट घालून… अमुकतमुक: काय…? अमुकतमुकची मैत्रिण: बडिशेप गं! अमुकतमुक: हं … मला वाटलं… जायफळ 🙂 अमुकतमुकची मैत्रिण: आणि हवा…
-
स्लॉट, व्हॅक्सिनेशन आणि ब्रह्मगाठ
नोव्हेंबर ते मार्च सारं काही सुरळीत बसवायच्या नादात दुसरी लाट आली आणि बरोबर लॉक डाऊन सुद्धा आला. एप्रिल बंदोबस्तात गेला. जरा परत सगळं मोकळं होईल म्हणतोय तोच मे चे १५ दिवसही लॉक डाऊन घोषित झाला. अवसान गळून पडलं आणि जैसे थे परिस्थिती समोर आली. लाटेचा जोरही होताच तसा पण त्याचबरोबर…
-
उत्साहाचं इंजेक्शन
करोना काळात आजूबाजूच्या बातम्या कशा तर… रूग्ण संख्या, हॉस्पिटलमध्ये असणारे बेड्स, मिळाल्या न मिळालेल्या लसी, कुणाचं वाढलेलं तापमान, कमी झालेला प्राणवायू, नक्की हवे की नको त्या गोष्टींची न करता आलेली यादी, गुगल वर आपोआप येण्याइतका… लॉ टाईप केलं की येणारा लॉक डाऊन… आणि असं बरंच काही… घराच्या आतल्या भिंती, सोफे,…
-
शिवाईकरांचा सार्वभौमत्वाचा जाहीरनामा
क्रमशः करो ना करो म्हणत म्हणत गुढीपाडव्याचा मुहूर्त पुढे जात जात २६ जानेवारीवर पोहोचला आणि आमची नवी बिल्डिंग प्रजासत्ताक झाली. जुन्या मालकांनी नव्या घराच्या चकचकीत किल्ल्या आणि घरावरच्या नावाच्या पाटीचा फोटो तात्काळ व्हॉट्स अपला आणि मंडळी जुन्याच्या नवलाईत रमून गेली. पूर्वी अगदी मुख्य रस्त्यावर असणारी आमची बिल्डिंग सर्वांची लाडकी होती.…
-
२०१९ च्या निवडणुका आल्या…
सकाळ आला, मोदी-राहुल गांधी यांचे चेहरे दिसले, पानभर निवडणुकांचे टप्पे पाहिले, जुन्या आठवणी जाग्या झाल्या, मतदार संघ, याद्या, उमेदवारांची नावे, त्यांची चिन्हं, त्यांची पत्रके, कर्णे लावून हिंडणाऱ्या रिक्षा, जाहिरातीचे बोर्ड अंगभर बाळगलेले टेम्पो, उमेदवारांच्या चिन्हांचे झेंडे/पट्टे/ दुपट्टे (त्याला काय म्हणायचं कोणास ठाऊक) गळ्यात बांधून हिंडणारे रिकामटेकडे कार्यकर्ते अचानक कामाला लागलेले…
-
वाढदिवसाचा सोहोळा
वाढदिवस साजरे करणे ही काही फारशी नवी गोष्ट नाही. शाळेत असताना म्हणजे चांगलं मोठ्ठं झाल्यावर ही टुम आयुष्यात आलेली आठवते. शाळेतल्या मैत्रिणी घरी येणार मग गप्पा, दंगा, भेटवस्तू आणि खाणे अशी ती संध्याकाळ वाया ? घालवायची म्हणजे वाढ दिवस साजरा करणे. हळूहळू कॉलेजमध्ये गेल्यावर वाढदिवस म्हणजे काही विशेष नाही अशी…
-
राखीव जागा हवीच!!
सिंह: हरणाला राजा केलं काय वेड बिड लागलं की काय? जंगलाचा राजा असतो केवळ सिंह. आज हरीण आहे उद्या ससा बसेल राज्य करायला? कोल्हा: अहो पण महाराज, गेली कित्येक युग तुम्ही राज्य केलं की, सगळ्या प्राण्यांना आता भीती पोटी जगणं नको वाटतंय, जरा मोकळा श्वास घेता यावा… सिंह: प्रधानजी, अहो…
-
बंद म्हणजे बंद
महाराष्ट्रात प्लास्टिकला बंदी जाहीर, प्लास्टिक बंदीचा तमाशा, मंत्र्यांना प्लास्टिकचा बुके, प्लास्टिक बंदी निवडणूक फंडासाठी, प्लास्टिक वापरल्यामुळे तीन लाखांच्या वर दंडवसुली, प्लास्टिक बंदी मुळे नोकऱ्या गेल्या, प्लास्टिक बंदीमुळे व्यवसाय बसला, प्लास्टिक बंदीमुळे व्यायाम बंद, प्लास्टिक बंदीमुळे बी पी शूट, प्लास्टिक बंदी मुळे कागद-कापडाला सोन्याचे भाव, प्लास्टिक बंदीमुळे गणपती बाप्पा चिंताग्रस्त…सगळीकडे हाहाकार…
-
रीकन्स्ट्रक्शन … इमारतीचं की मनाचं
रिकन्स्ट्रक्शन होतंय ही खरं तर काही फार वेगळी घटना राहिलेली नाही, पण आपण ज्या घरात तीस चाळीस वर्ष राहात होतो ती जागा सोडून दुसरीकडे जायचं हे जरा कठीणच जातं. फार पूर्वीच्या काळापासून मंजे अगदी वसाहती निर्माण झाल्या तेव्हापासून जुन्याचं नवीन करत असेलच ऐतिहासिक माणूसही. असो, तर तसंच आमच्याही घराचं रिकन्स्ट्रक्शन…
-
मृदुला….
आठवणी कायम गोड छान मनापासून जपाव्या जगाव्या अशाच असतात अशी ठाम समजूत असते आपली, जिवंतपणे जगलेले कितीक क्षण उराशी बाळगून एकेक नवा दिवस उगवत असतो आणि तोही नव्या ताज्या उमेदीनं जगायचं बळ देत असतो. पण एखादा दिवस असा असतो जो माणसाला खाड्कन जमिनीवर नेऊन आदळतो. तुझ्या हातात काहीही नाही, काही…