Category: रसास्वाद
-
आजच्या खेळा यश द्या देवा!
किती समर्पक ओळी आहेत ना या! खरंच एखाद्या कलाकृतीसाठी कलाकारांनी केलेले अथक परिश्रम, त्या कलेची साधना प्रेक्षकांसमोर केवळ काही वेळ सादर करायची, त्यावरून त्या कलाकृतीला दाद मिळणार की नाही याची वाट बघायची, किती कठीण काम, पण याच प्रयोगाला खेळ म्हणून त्यासाठी रसिकप्रेक्षकांच्या आशीर्वादासाठी घातलेलं हे गोड साकडं. चित्रपटगृहात आज ‘बापजन्म’…
-
देनिसच्या गोष्टी
सध्या माझा मुलगा चित्राच्या पुस्तकाकडून गोष्टीच्या पुस्तकाकडे वळतोय तसतसं लहान मुलांसाठी पुस्तकं शोधण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. काही दिवसांपूर्वी फेसबुक वर एका मैत्रिणीने शेअर केलेली पीडीएफ मिळाली. पुस्तक होतं ‘देनिसच्या गोष्टी’. मूळ पुस्तक रशियन भाषेत असून त्याचे मूळ लेखक आहेत विक्टर ड्रागुन्स्की. त्याचा मराठी अनुवाद केला आहे अनिल हवालदार यांनी.…
-
Tom Sawyer आणि Huckleberry finn च्या जगात
The adventures of Tom Sawyer हे एक जगप्रसिद्ध पुस्तक आहे. अगदी लहान मुलांची पुस्तक हातातून बाजूला जातात तेव्हा इंग्लिश पुस्तकाचं वाचन करणाऱ्या प्रत्येकाने सहावी सातवीत हे पुस्तक नक्की वाचलेलं असणार. मराठी वाचकांचा जसा फास्टर फेणे आवडीचा असतो तसा अमेरिकन कुमार वयोगटातली मुलं भेटतात ती Tom Sawyerला. मार्क ट्वेन या लेखकाचं…
-
चाकोरीबाहेरचं inside the box
out of the box अर्थात चाकोरीबाहेरचा वेगळा विचार, वेगळी कृती, वेगळ्या वस्तूंची निर्मिती, नवीन काहीतरी देण्याचा व्यापारी कंपन्यांचा प्रपंच चालू असतो. Drew Boyd व Jacob Goldenberg यांच्या ‘inside the box’ या पुस्तकातून मात्र ते उलट्या दिशेची ओळख करून देतात. या लेखकद्वयीचा असा विश्वास आहे की जगभरात ज्या नाविन्यपूर्ण वस्तू, कृती…
-
Fantastic वीकेंड
वीकेंड fantastic असतोच पण त्यातही तेव्हा जर खूप वर्षानी मित्र मैत्रिणी भेटायला आले, त्यांच्याशी गप्पा मारल्या, उकरून उकरून जुनी भांडणं केली की मग एकदम दिवस जिवंत वाटतात. दिवसाच्या शेवटी त्यांनी आपल्या आवडीचं एखादं पुस्तक हातात द्यावं आणि सोबत मुलालाही आवडेल असं गिफ्ट, मग तर काही विचारायलाच नको. नवऱ्याला सुट्टी, मुलगा…
-
संन्यस्त खड्ग
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेलं हे एक संगीत नाटक. भाषेचं माधुर्य सुयोग्य शब्दांच्या आणि समर्थ विचारांच्या पायावर उभं राहिलं की अधिकच खुलून यावं तशी ही एक विलक्षण कलाकृती ज्यात भाषेचं सौंदर्य आणि सामर्थ्य तर आहेच आहे पण याच विषयावरील वैचारिक उहापोह्देखील आहे. संन्यास व संसार याविषयीची मतमतांतरे व विरोधी दृष्टीकोण यात…
-
पिग्मॅलियन
‘पिग्मॅलियन’ या नाटकाचे नाटककार आहेत जॉर्ज बर्नॉर्ड शॉ. हे नाटक प्रथम सादर केलं गेलं १९१३ मध्ये. पिग्मॅलियन हे नाव आहे एका ग्रीक शिल्पकारचं, ग्रीक पुराणात असं म्हणतात की हा पिग्मॅलियन त्याच्या एका शिल्पाच्या प्रेमात पडला आणि ते शिल्प जीवित झालं. यावरून प्रेरित होऊन शीर्षक दिलं गेलं असावं. हे नाटक घडतं…
-
लहान मुलांसाठी Golden books
लहान मुलांना खूप चित्र असणारी पुस्तकं बघायला जशी आवडतात तशीच थोडी थोडी अक्षरओळख झाल्यावर त्यात लिहीलेलं वाचावं असंही वाटायला लागतं. मी पण असंच छानसं पुस्तक शोधताना एक पुस्तक हातात आलं ‘Little golden books’. ही लहान मुलांसाठीच्या पुस्तकांची एक मालिका आहे. ही पुस्तकं पार १९४२ पासून आजवर वाचली जात आहेत. त्यापैकी ३…
-
वाचून तर बघूया !
जे ऐकायला मिळू नये असं सध्या बातम्यातून सगळं ऐकायला आणि बघायला मिळतंय. स्वदेश, स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषा याविषयीचा असणारा सार्थ अभिमान चालू घडामोडी बघून अस्वस्थ करून सोडतो. त्यातूनच विवेकानंद, रामकृष्ण यांची आठवण होते. त्यानिमित्तानं शिवाजीराव भोसले यांनी विवेकानंद या विषयावर दिलेलं व्याख्यान ऐकलं. समाधान होईना म्हणून सर्च चालूच ठेवला. तर…