Category: पुस्तक परीक्षण
-
शिरवाडकरांच्या विनोदी कथा

परवा कथेच्या पुस्तकाचा शोध घेत असताना हे पुस्तक दिसलं. वि. वा. शिरवाडकर यांच्या विनोदी कथा. कवी कुसुमाग्रज आणि नटसम्राटचे नाटककार शिरवाडकर या पुस्तकात भेटले ते भलतेच निवांत लेखक म्हणून. साधी सरळ भाषा तितकेच साधे सरळ विनोद. या पुस्तकात पंधरा वेगवेगळ्या कथा आहेत, विषयही वेगवेगळे. हो, अगदी साधे सोपे. मुळात उत्कृष्ट…
-
गूढ आणि गंभीर जी ए: पिंगळावेळ

कॉलेजमध्ये असताना जीएंचं लेखन आणि त्याबद्दलही खूप ऐकलं. ते मुद्दाम वाचायला मात्र घ्यावंसं वाटलं नाही कारण ते कायमच गूढ, अनाकलनीय वाटत राहिलं. सध्या त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने बरेच कथावाचनाचे कार्यक्रम होताहेत. तेव्हा घरात असूनसुद्धा न वाचलेलं पुस्तक जरा वाचून तरी बघूया म्हणून खरं तर वाचायला घेतलं. पिंगळावेळ: कथांचं पुस्तक…. दीर्घ कथांचं.…
-
द फेमस फाइव्ह

माझं स्वतःचं शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं असल्यानं मुलांना पुस्तकं वाचायला देताना आधी मी ते वाचून मगच त्यांना देते. तशी टिनटिन चा फडशा पाडल्यानंतर भेटली ही एनिड ब्लायटन. द फेमस फाइव्ह ही तिने लिहिलेल्या मुलांच्या साहसकथांची मालिका आहे. या कादंबऱ्यांमधील प्रमुख पात्रे आहेत, जॉर्ज, डिक, अॅन, ज्युलियन आणि जॉर्जचा कुत्रा…
-
युगान्त
इरावती कर्वे यांचं ‘युगान्त’ हा आहे महाभारत कथेवरील शोधग्रंथ. महाभारतातील विविध पर्व कथा उलगडत जाते ती या कथेतील पात्रांच्या मदतीने. इरावती कर्वे या कथेतील रूढार्थाने प्रसिद्ध झालेल्या कितीक पात्रांची काहीशी नवी ओळख करून देतात आणि त्याबद्दलचे संदर्भ आणि त्याचं तटस्थपणे केलेलं विश्लेषण सादर करतात. प्रत्येक पात्राबद्दलची त्यांची भूमिका थोडक्यात सांगायची…
-
गीतेच्या गाभाऱ्यात
भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय पाठांतर, ज्ञानेश्वरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली तुम्ही निदान वाचा तरी असं आजीनी आवर्जून सांगितलेलं, टिळक जयंती निमित्त शाळेत झालेल्या निबंध स्पर्धेत लोकमान्य टिळकांनी तुरुंगात असताना गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला हे न विसरता लिहायचं म्हणून लक्षात ठेवलेलं ही आणि इतकीच काय ती गीतेविषयीची माहिती. या असल्या पायावर…
-
रामप्रहर
नोव्हेंबर १९९२ ते मे १९९३ या काळात ‘रामप्रहर’ हे सदर विजय तेंडूलकर यांनी लोकसत्ता दैनिकासाठी लिहिले. या पुस्तकात त्यातील निवडक ललित लेखांचे संकलन केलेले आहे. रातराणी आणि कोवळी उन्हे यातील ललित आणि रामप्रहर मधील ललित यात प्रचंड तफावत दिसून…
-
कोवळी उन्हे
महाराष्ट्र टाईम्समध्ये तेंडुुलकरांनी लिहिलेलं हे सर्वांग सुंदर सदर. हल्क-फुलकं हो, विजय तेंडुुलकर यांचंच पण हलकं फुलकं, बोलकं आणि जीवनावर निस्सीम प्रेम करणारं सदर. या पुस्तकात त्यांनी सदरात लिहिलेले निवडक लेख एकत्रित केले आहेत. त्यापैकी प्रत्येकच लेख मनापासून आवडलं. प्रत्येक लेख काही नं काही देऊन जाणारा, विचारांना चालना देणारा आहेच. ‘ठाकुरद्वारचे विठ्ठलराव…
-
आहे मनोहर तरी
8 मार्च, जागतिक महिला दिवस, हातात ‘आहे मनोहर तरी’ पुस्तकाचं शेवटचं पान आहे. नामी दिवस मिळाला आहे या पुस्तकाविषयी लिहायला. तशी या पुस्तकाची आणि माझी फार जुनी ओळख आहे. परंतु ती ओळख जरा नकारात्मकच असल्याने मी कधी या पुस्तकाकडे कधी वळले नाही. पुस्तक जेव्हा बाजारात आलं, तेव्हा सुनीताबाईनी लिहिलंय यापेक्षा…
-
The story of Toilets, Telephones & other useful inventions
शाळेचं स्वत;चं ग्रंथालय आणि तिथून स्वत:चं स्वत: पुस्तक ठरवून घरी घेऊन यायचं. हा किती सुंदर संस्कार आहे नं, आमच्या वेळी म्हणजे अगदी लहान शाळेत बाईच शाळेत पुस्तक वाचून दाखवत, घरी बिरी नेण्याची मजा नव्हती. मोठ्या शाळेत गेल्यावर मुली पुस्तकं खराब करतात म्हणून शाळेतून घरी न्यायला परवानगी आहे अशी जी पुस्तकं…
