Category: Marathi Content
-
विंदांच्या कवितांचे वाचन
गेल्या महिन्यात आम्ही कॉलेजमध्ये असताना सादर केलेला विंदांच्या कवितांचा कार्यक्रम पुन्हा एकदा केला…आता कविता थोड्या वेगळ्या पद्धतीने भेटल्या आणि बरोबर आमची बच्चेकंपनी… एक वेगळा अनुभव या काव्यवाचनाचे व्हिडिओ शेअर करतेय, Part 1. लहान मुलांनी सादर केलेल्या कविता:- https://youtu.be/Wp-vdLqJaxo Part 2. https://youtu.be/34XIGdHU3EE Listen to Vindanchi Kavita – Shevatcha ladu.m4a by नंदिता…
-
द फेमस फाइव्ह

माझं स्वतःचं शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं असल्यानं मुलांना पुस्तकं वाचायला देताना आधी मी ते वाचून मगच त्यांना देते. तशी टिनटिन चा फडशा पाडल्यानंतर भेटली ही एनिड ब्लायटन. द फेमस फाइव्ह ही तिने लिहिलेल्या मुलांच्या साहसकथांची मालिका आहे. या कादंबऱ्यांमधील प्रमुख पात्रे आहेत, जॉर्ज, डिक, अॅन, ज्युलियन आणि जॉर्जचा कुत्रा…
-
मानवी बुद्धिमत्ता की कृत्रिम बुद्धिमत्ता

पृथ्वीवरील सर्वात जास्त प्रगत प्राणी कोण? तर मानव, असे आपण म्हणतो. पण ह्यामागचं कारण काय बरं असेल? माणसाच्या शरीराची विशिष्ट ठेवण, त्याचा हाताचा अंगठा, की त्याचा मेंदू, अर्थात या सर्व बाबी पण त्याच्या प्रगतीसाठी नितांत आवश्यक गोष्ट होती ती म्हणजे मानवी बुद्धिमत्ता! मग त्याचा चाकाचा शोध असो, शिकारीच्या शस्त्रांचा वा…
-
वैज्ञानिक प्रयोग
प्रयोगाचे नाव: पाण्याची रहस्यमय पातळी उद्दिष्ट: पाणी कोणत्या पात्रात आहे यावर पाण्याची पातळी अवलंबून नसते. ते स्वत:ची पातळी शोधते. साहित्य: ३ पाण्याच्या बाटल्या (दोन बाटल्या तिसऱ्या बाटलीपेक्षा थोड्या मोठ्या असाव्या), २ स्ट्रॉ, चिकटवण्यासाठी फेव्हीकॉल, एम सील, खाण्याचा किंवा रंगविण्याचा रंग. आकृती: कृती: १. आकाराने मोठ्या दोन बाटल्यांच्या खालील एक तृतीयांश…
-
विज्ञानातील रंजक कथा

सर सी.व्ही. रामन यांच्या ‘रामन इफेक्ट’ या शोधाच्या निमित्ताने दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. प्रगल्भ बुध्दिमत्तेच्या जोरावर ज्यांना ‘आकाशाचा रंग निळा का?’ असा प्रश्न निर्माण झाला त्या डॉ. रामन यांनी वर्णपक्तींचा शोध घेतला आणि रामन परिणाम अस्तित्वात आले. त्यांनी घेतलेल्या प्रयत्नांना २८ फेब्रुवारी १९२८ रोजी…
-
गॅमा किरण व अतिनील अंतराळ दुर्बीण

गॅमा किरण क्ष किरणांपेक्षा अधिक शक्तीशाली असतात. त्यांचा वेध घेण्यासाठी उपग्रहाची आवश्यकता भासते. ही दुर्बीण उपग्रहाच्या मार्फत पृथ्वीच्या वायुमंडलाच्यावर सुमारे १५०- ३५,००० किमीच्या पल्ल्यापर्यंत जाऊ शकते. फर्मी गॅमा किरण दुर्बीण ११ जून २००८ रोजी नासाच्या डेल्टा २ या रॉकेटमधून प्रक्षेपित करण्यात आली. यातील लार्ज एरिया दुर्बीण संपूर्ण आकाशाचे गॅमा किरणांमध्ये…
-
बधाई हो बधाई

अमित शर्माने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट. आजकाल असे ही म्हणजे टिप्पीकल गाणी, मसाला स्टोरी नसलेले चित्रपट सुद्धा येतात आणि बॉक्स ऑफिसवर चांगलं यशही मिळवतात. अर्थात प्रेक्षकही चोखंदळ झाले आहेत असं म्हणूया. आयुष्यमान खुराना, सान्या मल्होत्रा, नीना गुप्ता, गजराज राव, सुरेखा सीकरी, शीबा चड्ढा अशी हटके चित्रपट करणार्या कलाकारांच्या अभिनयाने सुरेख…
-
बंद म्हणजे…
अमुकतमुकची मैत्रिण: ए काय करणार आज? अमुकतमुक: काय अगं व्हॅन वगैरे बंद नं..मग घरीच, म्युट अनम्युट करत काम चाललंय… तू काय करणारेस? अमुकतमुकची मैत्रिण: गाजराचा हलवा, आणि मटर पनीर..तुझा तो सिक्रेट इंग्रेडियंट घालून… अमुकतमुक: काय…? अमुकतमुकची मैत्रिण: बडिशेप गं! अमुकतमुक: हं … मला वाटलं… जायफळ 🙂 अमुकतमुकची मैत्रिण: आणि हवा…
-
माझे मत ही अगदी तसेच आहे…
गोंगाट आहे म्हणता, मला तरी तसे अजिबात वाटत नाही रोजच्या रोज रस्त्यावरुन मी ही गाडी चालवते… म्हणजे माझी तशी इच्छा असते. मग सिग्नल लागतो, मी थांबते… काही जण हॉर्न वाजवतात, मी सिग्नल कडे बघते. मग ते पुन्हा हॉर्न वाजवतात, मी बाजूला होऊन त्यांना जागा करून देते… म्हणजे हे एक असं…
