Category: अवकाशवेध
-
गॅमा किरण व अतिनील अंतराळ दुर्बीण

गॅमा किरण क्ष किरणांपेक्षा अधिक शक्तीशाली असतात. त्यांचा वेध घेण्यासाठी उपग्रहाची आवश्यकता भासते. ही दुर्बीण उपग्रहाच्या मार्फत पृथ्वीच्या वायुमंडलाच्यावर सुमारे १५०- ३५,००० किमीच्या पल्ल्यापर्यंत जाऊ शकते. फर्मी गॅमा किरण दुर्बीण ११ जून २००८ रोजी नासाच्या डेल्टा २ या रॉकेटमधून प्रक्षेपित करण्यात आली. यातील लार्ज एरिया दुर्बीण संपूर्ण आकाशाचे गॅमा किरणांमध्ये…
-
जेम्स वेब अंतराळ दुर्बीण
रात्रीच्या वेळी आकाशात पहिले की आपल्याला शेकडो चांदण्या लुकलुकताना दिसतात. त्या चांदण्या म्हणजेच दुसऱ्या कुठल्याशा आकाशगंगेतील सूर्यमालेचे सूर्य असू शकतात. स्वयंप्रकाशित असणारे हे तारे इतक्या दूर असतात की ती आपल्याला केवळ लुकलुकणारी तेजोमय बिंबे दिसतात. अमेरिकन अवकाश संस्था नासाने तयार केलेली जेम्स वेब अंतराळ दुर्बीण २५ डिसेंबर २०२१ रोजी अंतराळात…
-
चंद्रा क्ष- किरण वेधशाळा
पृथ्वीभोवती असणाऱ्या वायूमंडलामुळे तिच्या दिशेने येणारे क्ष किरण, गॅमा किरण, अतिनील प्रकाशकिरण त्यांच्या लहरलांबीनुसार वाटेतच शोषले जातात. त्यांचे पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत न पोहोचणे मानवजातीच्या कल्याणाचेच आहे. परंतु म्हणून त्यांच्या निरीक्षणाचा ध्यास मानवाने सोडलेला नाही, तो अंतराळतंत्रज्ञानात प्रगती करीत फुगे, रॉकेट, विमान वा उपग्रह यांची मदत घेत वायुमंडलाच्या वरच्या थरावरुन या किरणांचा…
-
हबल अंतराळ दुर्बीण
हबल ही दृश्य प्रकाशाचा वेध घेणारी परावर्तन दुर्बीण १९९० मध्ये अंतराळात प्रक्षेपित केले गेली. ही दुर्बीण पृथ्वीभोवती ६०० किलोमीटर अंतरावरून फिरते. पृथ्वीच्या पृष्ठभागावरून जेव्हा निरीक्षण केले जाते, तेव्हा सूर्यप्रकाश वायूमंडलातील धुलीकणांवर आपटून सर्वत्र पसरतो व बिंबे सुस्पष्ट दिसू शकत नाहीत. परंतु हबल सारखी दुर्बिण अंतराळात असल्याने ती वायूमंडलाच्या वरुन निरीक्षण…
-
रेडिओ दुर्बीण
दुर्बिणीच्या साहाय्याने मूळ दृश्य प्रकाशझोताची तीव्रता मोजणे, संगणक वापरून प्रकाशातील फोटॉनचे कमी-अधिक प्रमाण दर्शविणे, तारकांचे वर्णपट घेणे यासारखी निरीक्षणे केली जात होती. अशी प्रगती होत असताना रेडीओ लहरींचा वेध घेऊन सर्वप्रथम खगोलनिरीक्षण केले ते कार्ल्स जान्स्की या अभियंत्याने. अवकाशातील तारे त्यांच्या अंतरंगात घडत असलेल्या घडामोडींमुळे विद्युच्चुंबकीय लहरींचे उत्सर्जन करत असतात.…
-
आद्य दुर्बीण
पहिल्या आकाशगंगेची निर्मिती कशी बरं झाली? ग्रह, लघुग्रह, उल्का, अशनी यांची निर्मिती कशामुळे होते? दूरचे तारे बघता येतील का? या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं विज्ञानाकडे असतात का? मोठमोठ्ठे प्रश्न… उत्तरं नसणारे! मग अशा वेळी काय करायचं? खगोलशास्त्रज्ञ म्हणतात, घाबरायचं नाही, उत्तरं शोधत राहायचं! पण मग या अक्राळविक्राळ अंतराळाचा अभ्यास…