Category: कविता
-
हाय काय नाय काय?
पाऊस काय किडे काय निसर्ग काय कृत्रिम काय? करोना काय लॉक डाऊन काय इसेन्शियल काय नॉन इसेन्शियल काय? मास्क काय व्हेंटिलेटर काय टेम्प्रेचर गन काय मास्क काय? सिम्टम काय रिपोर्ट काय फालतू काय गंभीर काय? लस काय फोटो काय जादू काय चमत्कार काय? होम स्कूलिंग काय वर्क फ्रॉम होम काय …
-
पुरे झालं पाऊसपाणी
(कवी कुसुमाग्रज यांच्या “प्रेम म्हणजे“ या कवितेचा विडंबन प्रयत्न) पुरे झालं पाऊसपाणी, पुरे झाला वारा भरून वाहिले नदीनाले, भरून वाहिला झरा शहाण्यासारखा ढगाआड लपून रहा नेहमीसारखा पृथ्वीला आकाशातून पहा याच अंतरात सामावलंय जीवनचक्र याचा विश्वास दे तिला पाऊसवेडी माणसं आणिक प्रेमयाचना करतील काय? चिखला राडा रोडा सोडून तुझी आठवण…
-
पाऊस असा, पाऊस तसा
रिम झिम, रिपरिप, सरसर-सरसर पाऊस आला पाऊस ऊन, ऊन पाऊस, आषाढ-श्रावण वाद झाला पाऊस आला, पाऊस आला, भजी झाली भात झाला गर्दी झाली, सर्दी झाली, कौतुक झालं, सेल्फी झाला पाणी वाढलं, धरण भरलं, ट्रॅफिक जॅमला उधाण चढलं चिखल राडा, तुंबलं गटार, तेवढ्यात कोणी खड्ड्यात पडलंनुसता कंटाळा, हवा दमट,ओले कपडे, वास…
-
पाठीवर दप्तर हे….
कवी अनिल यांच्या ‘वाटेवर काटे…’ या कवितेचे विडंबन पाठीवर दप्तर हे…. पाठीवर दप्तर हे घेऊन चाललो चाललो जसा तुरुंगात चाललो | अडकवून पाठीशी कधी, डोक्यावर लटकवून कधी आपलीच मान मोडून चाललो | शाळेचा डबाही आत, रेनकोट-छत्रीही त्यात मनाशीच हुंदका देईत चाललो | सुटली बुटाची लेस, शाळेची दूर वेस निसटता…
-
मला काहीच येत नाही……….
मला पोळ्या येत नाहीत मला भाजी येत नाही मला लाडू, चिवडे, जॅम करून डबेही भरता येत नाहीत! मला लोकांशी बोलता येत नाही मला मुलांशी खेळता येत नाही मला चालू असलेलं शांत बघत पुढेही जाता येत नाही! मला भांडी घासता येत नाहीत मला फरशी पुसता येत नाही मला नोकरी करून…
-
अजून तरी ….
अजून तरी सकाळी उठलं की तुझ्याकडे बघावंसं वाटतंय अजून तरी तुझ्याशी तासनतास बोलावंसं वाटतंय म्हणजे अजून तरी सगळं ठीकठाक चाललंय! अजून तरी तू चिडलास की शांत राहावंसं वाटतंय अजून तरी तुझं चिडणं समजून घ्यावंसं वाटतंय म्हणजे अजून तरी सगळं ठीकठाक चाललंय! अजून तरी तुला हवं नको ते पाहावंसं वाटतंय अजून…
-
तेव्हा गणित चुकतं!
नवऱ्यामुलीची बायको होते, गृहिणी होते……… तोवर सगळं ठीक असतं गृहिणीची भांडेवाली होते, तेव्हा गणित चुकतं! आपल्या मुलांत आपले रूप, गुण पाहात असतो……… तोवर सगळं ठीक असतं आपली पोरं म्हणजेच आपण असं जेव्हा वाटू लागतं, तेव्हा गणित चुकतं! आजीआजोबा नातवंडांबरोबर प्रेमानं वेळ घालवत असतात…….. तोवर सगळं ठीक असतं नात्याच्या दडपणाने ते…
-
मला भेटणारा रविवार……
संदीप खरे यांच्या एका कवितेमध्ये बदल करत ….. मला भेटणारा रविवार…… आता इतका सहज सरळ उगवत नाही रविवार सकाळ होताच म्हणतो, आज आठवडी बाजार ! कर्तव्यागत उठतो आम्ही, नेमे शिजते भाजी कर्तव्यागत डोक्यावरती, भरून घेतो ओझी! पोहे-पॅटीस जातात दूर कुठल्या कुठल्या गावा शहाण्यासारखा पडून असतो रोजचा पेपर नवा! रविवारचं कौतुक…
-
जी जात नाही ती ….
बरं असतं लहानपणी विशेष काssही कळत नाही जात धर्म पंथ यातला फरक बिरक वळत नाही सगळेच असतात मित्र मित्र, सगळेच असतात आपले आपले खराss तो एकची धर्म म्हणत, घालत असतात साकडे-बिकडे हळूहळू मग मनावर संस्काssर वगैरे होऊ लागतात कळत नकळत; “त्यांच्या बाप्पाला नसतात तीन डोकी” “त्यांच्या बाप्पाचा रंग निळा नसतो”…
-
प्रेमदिवस वगैरे
बरं झालं आज तू स्वत:च हा विषय काढलास कारण आहे म्हणत जीव टांगणीवर लावलास…एकदाच काय ते सांगून टाक हो नाही काय ते दररोज काय तुझ्यासाठी मी नव्याने झुरायचे…. पुष्कळ दिवस झाले भेट होते आहे की आपली उगीच का ती जुई मी इतके दिवस जपली…. पुरे झाला दिशाहीन प्रवास तुझ्या तिरक्या…