सप्तरंगी घनरंगांनी न्हातेय संध्याकाळ ! भिरभिरत्या वाऱ्याने धरलाय फेर, सरसरत्या धारांसंगे धावतेय वेळ ! मनाचा आता मनाशीच बसत नाही मेळ म्हटलं आता देवा, हा पुरे झाला खेळ !