मोठ्ठी सुट्टी आहे म्हणून मुलांना शिबिरात पाठवलंच पाहिजे असं नाही
उठसूट सतत त्यांना काहीतरी शिकवलंच पाहिजे असं नाही
मुलं काही करत नाहीत म्हणून काऊन्सिलिंगला नेलं पाहिजे असं नाही
त्यांना कंटाळा आला तर काय… हे पालकांनी ठरवलं पाहिजे असं नाही
पाचवीपासून बारावीचं गणित आलं नाही तर जग बुडणार नाही
नाहीच आली एकही फॉरेन लँग्वेज तर प्रलय येणार नाही
झाले घरभर साबणाचे फुगे, परातीत पाणी घेऊन सोडल्या होड्या, तर काही वेळ वाया जात नाही
प्रत्येक अनुभव बायो डेटा मध्ये लिहीता आलाच पाहिजे असं नाही
भरलं आभाळ की पाऊस कोसळलाच पाहिजे असं नाही
आला मुद्दा मनात की लगेच मांडलाच पाहिजे असं नाही…
– नंदिता
