कुणी… कोणीतरी

Published by

on

लेकाच्या शाळेत कविता वाचन स्पर्धेसाठी कवितांचा शोध घेता घेता ही इंग्रजी कविता मिळाली, आवडली, डोक्यात रेंगाळत होती… त्या कवितेचा भावानुवाद करण्याचा हा मी केलेला पहिला प्रयत्न…

मूळ कविता:
Some One (1913)
Walter de la Mare
Someone came knocking
At my wee, small door;
Someone came knocking,
I’m sure — sure — sure;
I listened, I opened,
I looked left and right,
But naught there was a-stirring
In the still, dark night;
Only the busy beetle
Tap-tapping on the wall,
Only from the forest
The screech owl’s call,
Only the cricket whistling
While the dewdrops fall,
So I know not who came knocking,
At all, at all, at all.
भावानुवाद:
ठक ठक, ठक ठक दारावरती
आले कोण ते, वाजवले बरं कुणी?
खचीत पक्की गोष्ट नक्की
ठक ठक, ठक ठक दारावरती!
कानोसा घेऊनि दार उघडले,
सरुनि पुढति, वळुन पाहिले;
कुणी न दिसले तेथ समोरी,
घनगंभीर अंधार सोडुनी;
किरकिरणार्या रातकिड्याने
उसंत काढून मला पाहिले.
घुबड दूरच्या झाडीमधूनि
शीळ घालूनि रागे भरले.
मारीत होती झिट्टी शिट्टी,
दवबिंदूंच्या तालावरती.
कोण आले ते मला न उमगे,
ठक ठक करूनि दारावरती.
कवितेचा अनुवाद पहिल्यांदा करतेय, तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रिया नक्की मार्गदर्शक ठरतील…