बघता बघता Whileone एक वर्षाचं झालं

Infinite स्वप्नामधलं finite loop पूर्ण झालं 

मनापासून pass केल्यात load आणि stress tests

Response time आता आमचा आहे सगळ्यात best 

आजवरच्या experience चा data base पक्का साथ देतोय

आमच्या engineering performance चा benchmark ही set होतोय

बायको म्हणते नोकरी सोडताना “विचार कर एकदा”

कंपनीतला बॉस म्हणतो “दोस्ता, तू नको जाऊ बाबा”

पण आता, मागे सोडलंय बरंच काही, खूप पुढे आलोय

बाकी सब छोड छाड, आता आम्हीही scalable झालोय

की आता वाटतं मोठं व्हावं,

फार नाही, चार सहा मजल्यांचं ऑफिस व्हावं

भारताच्या नकाशावर आपलं टिंब दिसू यावं

की आता वाटतं मोठं व्हावं,

मोठमोठ्या कंपन्यांच्या यादीमध्ये सामील व्हावं

सेन्सेक्स आणि निफ्टीवर आपल्या शेअरनेही ट्रेड व्हावं

की आता वाटतं मोठं व्हावं,

स्वप्नाचं वास्तव करण्यासाठी जिद्दीने पेटून उठावं

गेट्स, पिचाई, मस्क बरोबर मंगळालाही भेटावं

– नंदिता