कवी अनिल यांच्या ‘वाटेवर काटे…’ या कवितेचे विडंबन

पाठीवर दप्तर हे….
पाठीवर दप्तर हे घेऊन चाललो
चाललो जसा तुरुंगात चाललो |
अडकवून पाठीशी कधी, डोक्यावर लटकवून कधी
आपलीच मान मोडून चाललो |
शाळेचा डबाही आत, रेनकोट-छत्रीही त्यात
मनाशीच हुंदका देईत चाललो |
सुटली बुटाची लेस, शाळेची दूर वेस
निसटता बूट फरफटीत चाललो |
खांद्यावर बाळगिले ओझे ममअभ्यासाचे
फेकून देऊन आता खेळास चाललो |
