
अर्थवाही जाणीवेची स्पर्शवेड्या भावनेशी भेट होते
चिंब ओल्या पावसाचे मौनगर्भी आर्ततेशी काय नाते?
या मनाचे त्या मनाशी काय नाते?
कर्मयोगी मानवांचे भोगवादी दानवांशी युद्ध होते
मृत्तिकेच्या देवतेचे भौतिकाच्या दैवताशी काय नाते?
या सुरांचे त्यासुरांशी काय नाते?
सुखवस्तू चरणांची भेदरल्या दु:खाला साथ होते
संचिताला जपण्याचे प्राक्तनाच्या जगण्याशी काय नाते?
या भ्रमाचे त्या भ्रमाशी काय नाते?
