माउली नाम

Published by

on

कष्ट साहिले, स्वप्नं पहिले
सोनसकाळी घरटे सजले…
गोकुळ भरले, शिवार नटले
आकाक्षांना धुमार फुटले…
आले वारे, गेले वारे
समृद्धीचे घन ओसरले…
मास ही सरले, अंकुर नुरले
ऋणाऋणाचे डोंगर झाले…
कंठ दाटले, झुकल्या माना
उमजे भुईचा निर्भय बाणा…
थकले नांगर, थिजले स्पंदन
आत्मघातकी विचारमंथन…
तत्क्षणी स्मरले माउली नाम
विरली छाया प्रकाश धाम
अपार शक्ति कणखर बाहूत
उभा राहिलो कसण्या अमृत

– युवोन्मेष २०१०

Pic credits: Bhavin Chandak

निसर्गाशी घट्ट नातं असलेल्या शेतकऱ्याला जर निसर्गानं कधी दगा दिला आणि मनात भलता विचार येऊन तो निराश झाला तर विठुरायाच्या आधारानंच सावरत असेल का तो?